अत्यंत दुर्दैवी - भद्रावती येथील सुमठाणा जवळ भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यु तर एक गंभीर..!
सोयरिक संबंध जुळवण्यासाठी दुचाकी गाडीला स्कॉर्पिओ ची जोरदार धडक..!
भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती येथे हायवेवर गुंडावार पेट्रोल पंप जवळ वरोरा येथून चंद्रपूर ला सोयरिक संबंध जुळवण्यासाठी निघालेल्या वरोरा तालुक्यातील खरवड गावातील कार्तिक मोहुर्ले यांच्या दुचाकी गाडीला भरधाव वेगाने मागून येणाऱ्या स्कॉर्पिओ या गाडीची जोरदार धडक बसली. या धडकेत मागे बसलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यु झाला, तर कार्तिक ला चंद्रपूर च्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.या दुर्दैवी घटनेने परिसरात शोक व्यक्त होतं आहे.
दुचाकी चालक हे गुंडावार पट्रोल पंप येथे गाडीत पट्रोल भरून चंद्रपूर कडे जातांना हायवे रस्ता वोलांडत असतांना हा अपघात घडला.अपघात एवढा भीषण होता की मृतक व्यक्तीच्या डोक्यातून रक्ताचा जणू पूर वाहत होता. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहचुन त्यांनी गंभीर जखमी असलेल्या कार्तिक ला चंद्रपूर ला पाठवले तर मृतक व्यक्तीचे शव भद्रावती च्या रुग्णालयात शवविच्छेदन गृहात पाठवले. या प्रकरणी स्कॉर्पिओ चालक यांची चौकशी भद्रावती पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार व त्यांचे सहकारी पोलीस करीत आहे.
