शिक्षणाधिकाऱ्यांसोबत शिक्षक भरतीची सभा संपन्न..!

भद्रावती (ता. प्र.) - चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या अनेक प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी शिक्षक भारती जिल्हा चंद्रपूरची सभा शिक्षणाधिकारी माध्यमिक येथे शिक्षणाधिकारी यांचे सोबत  नुकतीच संपन्न झाली. यात शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नाबाबत कार्यालयामार्फत दिरंगाई केली जात असून शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागतो हे शिक्षणाधिकारी यांना लक्षात आणून दिले .शिक्षकांचे वैद्यकीय बिल तसेच निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी, सेवानिवृत्त शिक्षकांचे पेंशन प्रकरण, मुख्याध्यापक पदाचे प्रस्ताव तत्काल निकाली काढावे व शिक्षकांचे कार्यालयातील प्रलंबित प्रश्न लवकर सोडवावे, अशा अनेक विषयांवर शिक्षणाधिकारी चव्हाण मॅडम तसेच उपशिक्षणाधिकारी मॅडम यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. येत्या पंधरा दिवसात सगळे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन शिक्षणाधिकारी चव्हाण मॅडम यांनी दिले.
 यावेळी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष भास्कर बावनकर, कार्याध्यक्ष पुरूषोत्तम टोंगे, बंडू बरडे, खोके,बोबडे तथ पदाधिकारी उपस्थिती होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".