लालकृष्ण अडवाणी सोबत साध्वी ऋतंबरा,साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना सुद्धा भारतरत्न द्यावा .!

लालकृष्ण अडवाणी सोबत साध्वी ऋतंबरा,साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना सुद्धा भारतरत्न द्यावा : अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेना

मुंबई (जगदीश काशिकर) : केंद्र सरकारने लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर केला. याचबरोबर राम मंदिराकरता अहोरात्र भारत भ्रमण करणाऱ्या साध्वी ऋतंबरा व हिंदू धर्माकरिता सात वर्ष जेल यातना भोगणाऱ्या साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना सुद्धा "भारतरत्न" मोदी सरकारने दयावा अशी मागणी "महाराष्ट्र करणी सेना" प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केली. लालकृष्ण अडवाणी पेक्षा हिंदुत्व करिता साध्वी ऋतंबरा व साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी कार्य केले आहे म्हणून केंद्र सरकारने लालकृष्ण अडवाणी सोबत साध्वी ऋतंबरा व प्रज्ञा ठाकूर यांना भारतरत्न देणे जरुरी होते. साध्वी ऋतंबरा यांनी अयोध्येतील राम मंदिर उभारण्याकरिता संपूर्ण देशभर भ्रमण केले होते, ठीक ठिकाणी त्यांच्या भाषणाला लाखो हिंदूची गर्दी होत होती हिंदूचे खऱ्या अर्थाने ब्रेनवॉश जर केले असेल तर ते साध्वी ऋतंबरा यांनी.
ती एक साध्वी आहे तपस्वी जीवन जगत (स्वतःसह) ती कधीही मुख्य प्रवाहात राजकारणात गेली नाही, तिने भगवद्गीतेच्या निवडक वाचनाद्वारे हिंदू धर्माच्या पुनर्रचनेसाठी प्रयत्न केला. 1989 -1992 दरम्यान, ऋतंबरा यांनी अनेक जाहीर भाषणे प्रसारित केली. ऋतंबरा यांच्या वक्तृत्व कौशल्यामुळे 1989 आणि 1991 च्या लोकसभा निवडणुका आणि अनेक राज्य-विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाची स्टार-प्रचारक बनली. विध्वंसाच्या वेळी ऋतंबरा उपस्थित होते, मशिदीच्या टेरेसवर उभे असताना गर्दीचा आनंद व्यक्त करत होते. बाबरी विध्वंसानंतर तीन दिवसांनी, तिला जातीय तणाव भडकवल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली.
30 सप्टेंबर 2020 रोजी, सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात इतर 32 आरोपींसह तिची निर्दोष मुक्तता केली. तिने स्त्रियांमध्ये भक्तीभाव जोपासण्याबरोबरच, वृंदावन आश्रमात कराटे, घोडेस्वारी, एअर गन आणि पिस्तूल हाताळण्याचे प्रशिक्षण देखील दिले आहे, 2024 पर्यंत, तिने अनाथ, विधवा आणि वृद्धांसाठी वृंदावन, उत्तर प्रदेश येथे ''वात्सल्य ग्राम'' हा आश्रम चालू आहे.
तसेच साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी हिंदू जनजागृती करिता प्रचंड असे कार्य केलेल्या आहे हिंदू धर्माकरिता त्यांनी काम कराव नाही म्हणून त्यांना काँग्रेस सरकारने खोट्या केस खाली जेलमध्ये डांबले होते. या दोन्हीही साध्वीचे कार्य लालकृष्ण अडवाणी यांच्या पेक्षा नक्कीच वरचढ आहे त्यामुळे यांना सुद्धा भारतरत्न केंद्र सरकारने देण्यात यावा असे सेंगर म्हणाले. कार सेवकावर गोळीबाराचे आदेश देणाऱ्या मुलायम सिंग यादव यांना भारतरत्न भेटू शकते. तर हिंदू धर्माकरिता आयुष्य समर्पित करणाऱ्या साध्वी ऋतंबरा व प्रज्ञा ठाकूर यांना भारतरत्न देण्यास काय हरकत आहे असा सवाल सेंगर यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.