भद्रावती (ता.प्र.) - आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्त भद्रावती येथील श्री साई कॉन्व्हेंट मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक अतुल गुंडावार ,कांताबाई गुंडावार, रूपा गुंडावार, मुख्याध्यापक अतुल भटकलवार, मुख्याधापिका किरण कोथळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सर्वप्रथम सरस्वती पूजन करून व सरस्वती वंदना गावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यात शाळेतील नर्सरी, एलकेजी, युकेजी ,पहिली ते दहावीच्या स्टेट आणि सीबीएससीच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस अशा देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अतुल भटकेलवार यांनी सूत्रसंचालन राखी पांढरे व अथर्व उपगंलावार यांनी उपस्थिताचे आभार अमिर शहा यांनी मानले. या सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेच्या कु. सेजल बिपटे, शर्वरी मेश्राम, कोमल डाखरे, पायल मेश्राम, हंसिका आदींसह इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदाचे सहकार्य लाभले.
आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्त साई कॉन्व्हेंट मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन..!
byChandikaexpress
-
0
