बोलीभाषेच्या प्रवाहित्वा मुळेच प्रमाणभाषेला महत्त्व - डॉ. ज्ञानेश हटवार

 जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात राबविण्यात येणार विसासंची परीक्षा .!

बल्लारपुर (का.प्र.) : मानवाने दैनंदिन व्यवहारासाठी भाषेचा शोध लावला. या भाषाशोधामुळेच भाषेची उत्तरोत्तर प्रगती झाली. मग प्रमाणभाषा व बोली भाषा असा फरक व्हायला लागला असला, तरी बोली भाषेतूनच प्रमाणभाषेची निर्मिती झाली, भाषेला प्रवाहित्व बोलीभाषेमुळेच प्राप्त झाले असल्याचे मत राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक संघाचे उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार यांनी मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूर जिल्हा, तालुका कार्यकारिणीच्या आयोजित आभासी सभेत अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
आभासी सभेचे  मुख्य अतिथी राज्य कोषाध्यक्ष  प्रा. संजय लेनगुरे, भंडारा, राज्य सल्लागार  डॉ. विजय हेलवटे, जिल्हा सल्लागार, प्राचार्य  धर्मराज काळे व उपप्राचार्य डॉ. सुधीर मोते,  जिल्हाध्यक्ष प्रा. नामदेव मोरे,  जिल्हा कार्याध्यक्ष  प्रा. गजानन सातपुते, जिल्हा सचिव प्रा. देविदास सालवटकर, प्रा. स्वाती गुंडावार प्रामुख्याने उपस्थित होते.
विदर्भ साहित्य संघ नागपूर या साहित्य संस्थे कडून राबविण्यात येत असलेल्या इयत्ता १२ वी साठी मराठी विषयची परीक्षा विद्यार्थी हित लक्षात घेता, मायबोली विकास विचारात घेता आपापल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये घेण्यात याव्या असा ठराव रेणुका देशकर यांनी मांडला.  त्या ठरावाला  प्रा. ताराचंद सोनकुसरे व प्रा. राजू केदार यांनी अनुमोदन दिले. विद्यार्थी हित लक्षात घेता विदर्भ साहित्य संघामार्फत घेतली जाणारी मराठी विषयाची परीक्षा सर्व कनिष्ठ महाविद्यालयात राबविण्याचा ठराव आभासी सभेत सर्वांनुमते  मंजूर करण्यात आला.
यावेळी प्राचार्य काळे यांनी मराठी भाषेला समृद्व परंपरा लाभली असून अनेक साहित्यिक व संतांनी मराठी भाषेतून ग्रंथनिर्मिती करून इतिहास निर्माण केला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रा. संजय लेनगुरे यांनी प्रमाणभाषा जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच बोलीही कशी महत्त्वाची आहे, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट केले. डॉ. सुधीर मोते यांनी शिक्षकांनी प्रमाणभाषेतूनच अध्यापन केले पाहिजे. कारण विद्यार्थी हा अनुकरणशील असतो. त्यामुळे शिक्षकाचे संस्कार विद्यार्थ्यांवर होत असतात. म्हणून शिक्षकांनी शिकवित असताना प्रमाण भाषेतच अध्यापन करावे, असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.  महाराष्ट्रात  इयत्ता बारावी पर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करण्यात आला  व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे मराठी विषय महासंघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रा. नामदेव मोरे, संचालन प्रा. योगिता धांडे तर आभारप्रदर्शन प्रा. शुभांगी मोहितकर यांनी केले.  यावेळी मराठी विषय शिक्षकांच्या समस्यांची उकल करण्यात आली. सभेला राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष प्रा. यशवंत पवार यवतमाळ, प्रा. विनोद हटवार  भंडारा, प्रा. विजया मने गडचिरोली, प्रा.पवन कटरे गोंदिया ,सुरेश नखाते नागपूर तसेच भंडारा, गोंदिया येथील पदाधिकारी, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, मराठी विषय शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.