आ‌.कपिल पाटील यांना कर्मचाऱ्यांचे निवेदन.!

जि.प. चंद्रपूर मधील शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांचे आदिवासी एकस्तर वेतनश्रेणीबाबत निवेदन..!
भद्रावती (ता.प्र.) - शिक्षक भारतीचे संघटने चे अध्यक्ष, विद्यमान आमदार मा.श्री कपिल पाटील विधान परिषद मुंबई यांना जि.प. प्राथमिक शिक्षक संघटने तर्फे जि.प. शिक्षक व आरोग्य कर्मचारी यांना हक्काचा प्रलंबित आदिवासी भत्ता मिळावा यासाठी निवेदन दिले. शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा अधिवेशन कार्यक्रमानिमित्त आमदार कपिल पाटील हे चंद्रपूर येथे आले होते. या दौऱ्याचे निमित्त साधून आदिवासी क्षेत्रात सेवा बजावलेले शिक्षक व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना कोर्टाचे आदेश असूनही, जिल्हा परिषद चंद्रपूर केवळ मुख्यालयात वास्तव्य करत नसल्याचे कारण दाखवून एकस्तर वेतन श्रेणी व प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित ठेवलेले आहे. 
या अन्यायाच्या विरोधात माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना वारंवार निवेदने, चर्चा व आंदोलन करून मागणी मागण्यात आली, परंतु प्रत्येक वेळेस त्यांनी जीआर चा उल्लेख करत एकस्तर चा लाभ देण्यास नकार दर्शविला व तसे पत्रही काढले‌. परंतु काही कर्मचाऱ्यांनी कंटेम ऑफ कोर्क रून जिल्हा परिषद चंद्रपूरला वेठीस धरले असता त्या 56 लोकांना मात्र त्यांनी याच शासन निर्णय दिनांक 6 ऑगस्ट 2002 च्या शासन निर्णयाप्रमाणे लाभ दिला व त्यांना कुठलीही पडताळणी समिती नेमली नाही, वा वास्तव्याच्या प्रमाणपत्राची अट घातली नाही. त्यांना सरसकट लाभ देण्यात आला. त्याचप्रमाणे आम्ही 233 शिक्षक - आरोग्य कर्मचारी यांनी WP 3895 माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या दिनांक 19 सप्टेंबर 2022 या निर्णयानुसार शासन निर्णयाप्रमाणे कुठल्याही अटी व शर्ती न ठेवता आदिवासी क्षेत्रात सन 2002 पासून कर्तव्य बजावलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित दराने प्रोत्साहन भत्ता रुपये पंधराशे व नजीकच्या पदाची एक स्तर वेतनश्रेणी देण्याचे डायरेक्ट आदेश दिलेले आहेत. 
तरीसुद्धा जि. प. चंद्रपूर केवळ मुख्यालयात राहत नसल्याच्या कारणाने, इतर पत्राचा उल्लेख करून वारंवार पात्र असलेल्या कर्मचाऱ्यास एकस्तर वेतन श्रेणी पासून वंचित ठेवत आहेत. त्यामुळे या अन्यायाचा विरोध करण्यासाठी आमचे शिष्टमंडळाने शिक्षक भारतीचे विद्यमान आमदार मा.श्री कपिल पाटील विधान परिषद मुंबई यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. तसेच शिक्षक भरतीचे राज्य उपाध्यक्ष व येणाऱ्या निवडणुकीचे उमेदवार श्री राजेंद्र झाडे सर यांना सुद्धा या प्रश्नाबाबत अवगत केले व हा प्रश्न सोडवण्यासाठी विनंती केली. 
येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी वा तारांकित द्वारे हा मुद्दा मी सभागृहात उपस्थित करणार असे आश्वासन आमदार महोदयांनी दिले.सदर निवेदन देताना शिक्षक भारतीचे विभागीय प्रमुख सुरेश डांगे चिमूर, डॉ. ज्ञानेश हटवार, योगेश्वर नागोसे सर,डॉ. मोते सर,शिक्षक भारती अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा अध्यक्ष निसार शेख सर भद्रावती यांच्या सहकार्याने आपले निवेदन व चर्चा यशस्वी पणे करण्यात आली.सदर निवेदन देताना अजय बोंडे सर , कैलास उरकुडे सर,दिवाकर कुमरे सर, कुमारी रंजना तडस मॅडम ईत्यादी शिक्षक कर्मचारी उपस्थितीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.