लोकमान्य विद्यालय भद्रावतीच्या मुलींचा संघ 17 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत जिल्हास्तरावर विजयी ..! विभागीय स्पर्धेत लोकमान्यचा संघ करणार चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व .!
भद्रावती (ता. प्र.) - जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय 17 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात सर्वोदय विद्यालय सिंदेवाही या संघावर सात गडी राखून अंतिम सामन्यात विजय मिळविला.यानंतर नागपूर विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत लोकमान्य विद्यालय हा संघ चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
लोकमान्य भद्रावतीच्या विजेत्या संघात अमोली गेडाम, अवंतिका नागोसे, अश्विनी खुटे माटे, उमादेवी आस्वले, चंचल नागपुरे ,चित्रा वडस्कर, जान्हवी बोरीकर, तेजस्वी रोडे, अनन्या खारकर, धनश्री डाहुले ,प्रिया ढेंगळे, यशस्वी आ, राजश्री गेडाम ,लक्ष्मी बदखल , श्रावणी बोम्मावर या खेळाडूंचा सहभाग होता. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या मार्गदर्शक शिक्षकांना दिले. विजयी संघाचा लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालया तर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य आशालता सोनटक्के, उपप्राचार्य सचिन सरपटवार, पर्यवेक्षक रूपचंद धारणे तसेच शिक्षक प्रिया भास्करवार, सचिनकुमार मेश्राम ,विशाल गावंडे ,रवी नंदनवार, मयूर पोटे यांनी उपस्थित होते. खेळाडूंचे कौतुक केले.