भद्रावती (ता. प्र.) - जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर व तालुका क्रीडा अधिकारी भद्रावती त्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय तायकांदो स्पर्धेत भद्रावती येथील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. तायकांदो या क्रिडा प्रकारात विभागीय स्पर्धेत ते चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
भद्रावती येथील नीलकंठराव शिंदे महाविद्यालयाच्या स्टेडियम मध्ये आयोजित झालेल्या जिल्हास्तरीय तायकांदो स्पर्धेत जिल्हातुन अनेक खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेमध्ये यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील 19 वर्षे वयोगटाखालील मुलींमध्ये सुहानी शिरपूरकर व रोशनी चतारे यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत नैपुण्य दाखवले व विभागीय स्तरावर निवड झाली आहे. 17 वर्षे वयोगटाखालील मुलींमध्ये अनुष्का काळे तर मुलांमध्ये कार्तिक खेमस्कर , आशिष देऊरकर ,पियुष नगराळे यांनी जिल्ह्यावर वर्चस्व गाजवत विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
तायकांदो या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर अव्वल येऊन विभागीय स्तरावर निवड झालेल्या समस्त खेळाडूंचे भद्रावती शिक्षण संस्था , भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे , सचिव डॉ. कार्तिक शिंदे , सहसचिव डॉ. विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे ,
प्राचार्य एम.यु बरडे , क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण, डॉ. ज्ञानेश हटवार, माधव केंद्रे, किशोर ढोक, नरेश जांभूळकर समस्त प्राध्यापक, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विभागावर निवड झालेल्या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.