संविधानाने जगण्याची मूल्य दिलीत - डॉ. वानखेडे
भद्रावती (ता.प्र.) - यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे संविधान दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय पर्व सप्ताहाचे आयोजन करण्यात आले . यात मार्गदर्शन करताना संविधानाने आपल्याला जगण्याची मूल्य दिली.असे प्राचार्य डॉ.जयंत वानखेडे यांनी मार्गदर्शन केले .
यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे समाज कल्याण कार्यालय यांच्या निर्देशानुसार संविधान दिनापासून सामाजिक न्याय पर्व सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक न्याय पर्व सप्ताहा निमित्त यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात संविधान प्रस्ताविकेचे वाचन , वादविवाद स्पर्धा,व्याख्यानमाला, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. व्याख्यानमा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक उज्वला वानखेडे , प्रेमात पोटदुखे हे व्यासपीठावर उपस्थित होते . अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी "संविधानाने आपल्याला जगण्याची मूल्य दिलीत, याची जाण आपण ठेवली पाहिजे" असे मार्गदर्शन केले. प्रा. प्रेमा पोटदुखे यांनी संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्य यावर मार्गदर्शन केले, तर प्रा. उज्वला वानखेडे यांनी आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे असे मार्गदर्शन केले.
वक्तृत्व स्पर्धेत,वादविवाद स्पर्धेत, निबंध स्पर्धेत व प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला तर रांगोळी स्पर्धेत विद्यार्थीनींनी सुंदर रांगोड्या रेखाटल्या.वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण डॉ. सुधीर मोते यांनी केले . वादविवाद स्पर्धेचे परीक्षण डॉ.ज्ञानेश हटवार यांनी केले तर निबंध स्पर्धेचे परीक्षण किशोर ढोक यांनी केले . प्रश्नमंजुषाचे परीक्षण प्रेमा पोटदुखे व संगीता जक्कुलवार यांनी केले.रांगोळी स्पर्धेचे परीक्षण उज्वला वानखडे, प्रणिता बोकडे यांनी केले. व्याख्यान माला कार्यक्रमाचे प्रस्ताविक माधव केंद्रे यांनी केले. संचालन डॉ. वर्षा दोडके यांनी केले, तर आभार प्रदर्शन कमलाकर हवाईकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहरकर सर,बोरकुटे सर, आवारी सर, मते सर व समस्त प्राध्यापक वर्ग यांनी परिश्रम घेतले.