बल्लारपूर (का.प्र.) - बॉल बॅडमिंटन या खेळात गोंदिया येथे झालेल्या सब ज्युनिअर स्टेट लेवल बॉल बॅडमिंटन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याच्या मुले व मुलींच्या संघांनी सहभाग घेतला.या स्पर्धेत सहभागी खेळाडूंचे प्रमाणपत्र वितरण सोहळा दिनांक ०३ डिसेंबर २०२२ ला महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयात इंग्लिश मिडीयम कॉमर्स विभागाने घेतला.
प्रमुख पाहुणे आयडीअल इंग्लीश मिडीयम स्कूल चे प्रशासक श्री. नायर सर, तसेच प्राचार्य कोठारकर सर, वैभव कॉन्व्हेन्ट च्या संचालिका सौ. पांडे मॅडम, बल्लारपूर पब्लिक स्कुलच्या प्राचार्या सौ. देशमुख मॅडम आणि चंद्रपूर जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशन चे सचिव श्री. प्रकाश सर उपस्थित होते. अध्यक्ष कनिष्ठ विभागाच्या प्रमुख सौ.मसादे मॅडम उपस्थित होत्या. दीप प्रज्वलनकरून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व मान्यवरांचे भाषण झाले. त्यानंतर खेळाडूंना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
नवीन खेळ Crossbow Shooting ची माहिती देण्यात आली. आभार प्रदर्शन झाल्यानंतर Crossbow Shooting चे प्रशिक्षण देण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संचालन सोनाली मॅडम, आभार प्रदर्शन जोसेफ मॅडम यांनी केले.