विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूर ची सहविचार सभा संपन्न.!

चंद्रपुर (वि.प्र.) - 4 डिसेंबर 2022 ला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,चंद्रपूरच्या वतीने जनता हायस्कूल, चंद्रपूर सिव्हिल लाईन येथे सहविचार सभा संपन्न झाली. माजी शिक्षक आमदार मा.व्ही.यु.डायगव्हाणे साहेबांनी सभेला संबोधित करताना विजयाची माळ नक्की आपल्याच उमेदवाराच्या गळ्यात पडणार आहे तरीपण प्रचार यंत्रणेत आपण गाफिल न राहता सक्षमतेने हाऊस टू हाऊस स्वतः भेटी घ्याव्या असे आव्हान केले.
सरकार्यवाह सुधाकरराव अडबाले यांनी आजपर्यंत विभागात घेतलेल्या सभांचा आढावा दिला आणि आपण प्रचार यंत्रणेत सर्वांपेक्षा आघाडी घेतली याची सभेला जाणीव करून दिली.अशिच प्रचार यंत्रणा पुढेही चालू सर्वांनी ठेवावी असे आवाहन केले. मा.जगदीश जुनगरी यांनी आपल्या उमेदवाराचा प्रचार भक्कम जोरात सुरू आहे आपण त्याला सक्षमपणे साथ देऊया असे सांगितले.
जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे व जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी जिल्ह्यात मतदान नोंदणी ते प्रचार यंत्रणेचा आढावा दिला.सभेचे अध्यक्ष मा. व्ही.यू.डायगव्हाने साहेब प्रमुख उपस्थिती सरकार्यवाह तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकरराव अडबाले महामंडळ सहकार्यवाह जगदीश जुनगरी जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे कोषाध्यक्ष लक्ष्मणराव धोबे माजी जिल्हाध्यक्ष मारोतराव अतकारे,दादा दहीकर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकर उपाध्यक्ष नामदेव ठेंगणे प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर पारखी संघटक मनोज वासाडे मा.प्र.दिपक धोपटे चंद्रपुर ता.अध्यक्ष अवताडे सर ता.कार्यवाह सुरेंद्र अडबाले श्रीकांत पोढे ,बल्की सर, मोहितकर सर व इतर शिक्षकांनी सहकार्य केले. सभेला जिल्ह्यातील तालुक्याचे व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था नागपूर विभाग च्या कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले.
जय विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ,चंद्रपुर.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.