चंद्रपूर (वि.प्र.) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आदरांजली चक्र अर्पण करण्यासाठी वार्डावॉर्डातून रॅली चे आयोजन बुद्ध विहार मंडळाकडून केले जाते व हि रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जाऊन विनम्र अभिवादन करीत पुष्पचक्र अर्पण करित असते.
या करीता दिनांक 3/12 /22 रोजी सायंकाळी 07/00 वाजता स्थळ पोलीस स्टेशन रामनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शांतता समितीचे सदस्य तसेच बुद्ध विहार मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी यांची बैठक रामनगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक राजेश मुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली .या बैठकीत शांतता समिती चे राजेंद्रसिंह गौतम, बाळु खोब्रागडे, सय्यद रमज़ान अली,धनंजय दानव, पियूष मेश्राम,शालिनी भगत, ताजुद्दीन शेख सह बुद्ध विहार मंडळाचे रामनगर हद्दीतील पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले व रॅली शिस्तबध्द रित्या काढली जाईल व सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती देखील केली. 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाला भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आल्याची माहिती बाळु खोब्रागडे यांनी दिली. शांतता समितीचे सदस्य तसेच मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी बैठकीस हजर होते.आभार प्रदर्शन पोलिस स्टेशन रामनगर चे राजु अरवेल्लीवार यांनी व्यक्त केले.