रेल्वेतून पडून मृत्यूची भीती, पोलीस ओळख पटवण्यात गुंतले.!
भद्रावती (ता.प्र.) - गुरूवारी दुपारी 3 - 30 वाजता दिल्ली चैनई मुख्य मार्गावरील माजरी रेल्वे सिल्गन अप लाईनवरील पोल क्रमांक 841B-27 ते पोल क्रमांक 841B-29 जवळ एका 30 बवर्षीय अनोळखी युवकाचे मृतदेह रेल्वे रुळांच्या कडेला पडलेला आढळून आला.
माहिती मिळताच माजरी पोलीस चौकीचे अजितसिंग देवरे यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस सहाय्यक गजानन तुपकर आणि अविनाश राठोड घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, मात्र ओळख पटू शकली नाही.त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी वरोरा ला पाठवण्यात आला.
मृतक व्यक्ती चे वर्णन गोरा असून गुलाबी टी शर्ट,हिरवा नाईट पेंट आणि उजव्या हाथावर ‘जी’ असे गोंदन आहे. सामाजीक सेवक विजय कडुकर यांच्या आर्थिक सहकार्य ने मृतकांचे अंत विधी पार पडली . पुढील तपास ठाणेदार अजितसिंग देवरे यांच्या नेतृत्वाखाली गजानन तुपकर करत आहे.