प्रथम जिल्हा स्तरीय चेस चॅम्पियनशीप स्पर्धा ३० एप्रिल ला भद्रावती मध्ये ..!
भद्रावती (ता.प्र.) - अमेचुर चेस असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट व मायक्रुन स्टुडंन्ट्स अकादमी , सुमठाणा,भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 30 एप्रिल 2023 रोज रविवार ला मायक्रुन स्टुडंन्ट्स अकादमी स्कूल,सुमठाणा,भद्रावती येथे सकाळी 09 ते 05 वाजे दरम्यान प्रथम जिल्हास्तरीय स्पर्धा चे आयोजन करण्यात आलेले आहे.
या बुद्धीबळ स्पर्धा माननीय श्री पांडुरंग सोमाजी आंबटकर (अध्यक्ष - अमेचुर चेस असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट ) यांच्या प्रमुख मार्गदर्शन मधे आयोजित करण्यात येत आहेत.
या स्पर्धचे मुख्य आकर्षण सर्व विजेत्या स्पर्धकांना एकुण 37 हजार 500 रुपये चे नगद पुरस्कार व भव्य आकर्षक ट्रॉफी व मेडल ने सम्मानीत करण्यात येणार आहेत. सर्व सहभागी होणाऱ्या स्टूडेंट्स ना जिल्हा चेस असोसिएशन द्वारा प्रावीण्य व सहभाग सर्टिफिकेट देण्यात येणार आहेत.
तेव्हा जिल्ह्यातील सर्व बुद्धीबळ प्रेमींनी या स्पर्धांचा लाभ घ्यावा, असे आव्हान स्पर्धा संयोजक रेंशी दुर्गराज एन रामटेके (संस्थापक व सचिव - अमेचुर चेस असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट ),तसेच आयोजन समितीचे प्रमुख प्रा. दुष्यंत नगराळे,सुरज जयस्वाल , अतुल कोल्हे,अरविंद बनकर,अशोक कामडे, बंडू करमनकर, श्रीहरी गॅसकांटी,संजय सिंग, सुधीर माथेरे, मिलिंद वाघमारे, अजय पाटील,संजय माटे, उलफतद्दीन सय्यद, मनिष भागवत,बंडू रामटेके, विकास दुर्योधन,सुमंत सिंग, आशिष चुनारकर, गोपाल कळमकर , हरिदास मेश्राम,जितु सिंग, सतीश कवाडे, महेंद्र मेश्राम, करण डोंगरे,संदीप पंधरे,किशोर झाडे,आनंद डांगे व समस्त पदाधिकारी अमेचुर बुद्धीबळ असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट यांनी आवाहन केले आहे.