राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार च्या वतीने चंद्रपूरात आयोजित शोकसभेत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना वाहीली भावपूर्ण श्रध्दांजली। !
बल्लारपुर (का.प्र.) . आज दिवसभर विविध वृत्त वाहिन्या, टिव्ही चॅनल्स, सोशल मीडियावर सर्वत्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनाच्या दुःखद बातमीने संपूर्ण महाराष्ट्रासह चंद्रपूर जिल्हा सुध्दा शोकमग्न झाल्याचे निदर्शनास आले. चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज सायंकाळी ५ वाजता रामनगर स्थित पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या उपस्थितीत शोकसभा आयोजित करण्यात येवुन विमान अपघाती निधन झाल्याबद्दल स्व.अजितदादा पवार यांच्या फोटोला पुष्पहार वाहुन मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली युवक काँग्रेसचे मुनाज शेख, रोशन कोमरेड्डीवार, रमेश माखिजा, दीपक उराडे, अरविंद मार्हुपवार, सागर आखरे, सौ.पुजा शेरकी, जर्नलिस्ट कु. माधुरी कटकोजवार, भुवनेश्वर निमगडे, अनुप बेले, परब गिरडकर, महेश काहीलकर यांचेसह असंख्य कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.
