कोणी ही केले थोडे चांगले काम... तर येते ज्याच्या डोक्याला ताण...
असे कुठे गेले ते बनावटी समाज सेवक..
एखादी सामाजिक चर्चा घडवली.... त्यास बघुनी ज्याची विनाकारण जीभ कुर्कुरली...
असे कुठे गेले ते बनावटी समाज सेवक..
त्याने केले काम त्याचे होईल नाम...मला काय होईल त्याचा लाभ ... म्हणून त्याला करुनी बदनाम त्याचा नावाचा करूण सत्यानाश....
असे कुठे गेले ते बनावटी समाज सेवक..
मी एका पक्षाच्या विचार धारेचा... तू दुसऱ्या कोणत्या पक्षाचा... नाही तू आमच्या जातीचा..... तू फक्त त्या पक्षाचा.....
असे म्हणणारे कुठे गेले ते बनावटी समाज सेवक..
त्याने चांगले काम केले तर तो नावाचा भुकेला.... आणि मी केले तर मी नाही कश्याचा ही भुकेला....
असे म्हणणारे कुठे गेले ते बनावटी समाज सेवक..
भाषा तर विचारांचे आदान प्रदान करणारे शास्त्र असते. त्यातही तू माझा तुझा करते..... एका रक्ताचा असूनी भावा भावाला पिवडते...
असे करणारे कुठे गेले ते बनावटी समाज सेवक..
कोणी राजनीतिक शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो....कोणी शैक्षणिक शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.....त्यास ढोंगी दाखविण्याचा तू आटोकाट प्रयत्न करतो..
असे करणारे कुठे गेले ते बनावटी समाज सेवक..
प्रा.राहूल जी. गौर
नागपूर महाराष्ट्र
