डॉ. विवेक शिंदे यांचा हस्ते ध्वजारोहण .!

यशवंतराव शिंदे विद्यालय व . महा. भद्रावतीत भारताचा ८० वा स्वतंत्र दिन उत्साहात संपन्न .. सुवर्णपदक विजेते डॉ पुजा देऊरकर व निलेश कुळसंगे यांचा सत्कार  .!

भद्रावती (वि.प्र.) : भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चिचोर्डी, भद्रावती येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती तथा सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, तर प्रमुख अतिथी प्रा. डॉ कार्तिक शिंदे सचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, डॉ प्रकाश महाकाळकर गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, भद्रावती, माजी प्राचार्य डॉ जयंत वानखेडे विश्वस्त, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, दिलीप शिंदे विश्वस्त, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, प्राचार्य एल एस लडके, धनराज अस्वले ज्येष्ठ समाजसेवक, भद्रावती, डॉ सुधीर मोते प्राचार्य, डॉ पूजा देऊळकर, विश्वविजेत्या योगपटू, निलेश कुलसंगे सुवर्ण पदक विजेता धावपटू, अजय दर्वे पालक प्रतिनिधी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ विवेक शिंदे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  
या कार्यक्रमात जागतिक योगा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक प्राप्त करून देणाऱ्या योगपटू, सुवर्णकन्या डॉ पुजा देऊरकर यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभ पर्वावर पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आले . महाराष्ट्राला सुवर्णपदक प्राप्त करून देणाऱ्या धावपटू निलेश कुळसंगे यांचाही पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
 
उपस्थितांना अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ विवेक शिंदे यांनी "भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. आपण सर्वांनी आपल्या कर्तृत्वाने , देशाभिमानी वृत्तीने, व्यसनमुक्त, आदर्श समाज निर्मितीसाठी कार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी प्रा डॉ कार्तिक शिंदे, पंचायत समिती भद्रावती चे गटशिक्षणारी डॉ प्रकाश महाकाळकर, प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुवर्णकन्या, योगपटू पुजा देऊळकर व सुवर्णपदक विजेता धावपटू निलेश कुळमेथे यांनी सत्काराला उत्तर दिले. यावेळी विद्यार्थ्यांची देशभक्तीपर गीत गायन, सामूहिक कवायत, भाषणे झालीत. एनसीसी पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. 
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मागील तीन दिवसापासून यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही तिरंगा रॅली महाविद्यालयापासून आंबेडकर चौक ते पुन्हा महाविद्यालयात परत अशी काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा रॅलीचे स्वागत केले. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. 
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर ढोक यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले. प्रा. रमेश चव्हाण यांनी शारिरीक कवायत व पटांगणारील व्यवस्था सांभाळली. भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती अंतर्गत असलेल्या निळकंठराव शिंदे विज्ञान कला महाविद्यालय, भद्रावती , यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चिचोर्डी भद्रावती , डॉ विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय, भद्रावती , मातोश्री नीलिमाताई शिंदे महिला महाविद्यालय भद्रावती व यशवंतराव उच्च प्राथमिक विद्यालय चिचोर्डी, यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक विद्यालय सूर्य मंदिर वार्ड भद्रावती आदी शाळा महाविद्यालयातील समस्त विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".