चंदनखेडा येथे रेती माफियांचा मुजोरीपणा..

भद्रावती (ता.प्र.)  - "कारवाई करताना तहसीलदार अनिकेत सोनवणे सोबत नायब तहसीलदार भांदक्कर यांच्या वाहनावर धडक देऊन केला  प्राणघाती हल्ला'. 

भद्रावती तालुक्यातील काही रेती घाटाचे लिलाव झाले नसले तरी  प्रशासनाच्या नाकावर निंबू पिळून काही घाटावर अवैध रेती तस्कर हे भद्रावती शहरात आणि तालुक्यात रेती तस्करी मोठ्या जोमाने करत आहे. दि- २९ मे ला तालुक्यातील चंदनखेडा येथे रेती तस्करी वर कारवाई ला गेले असताना तहसीलदार अनिकेत सोनवणे यांच्या वाहनाला  मागून धडक देऊन प्राणघाती हल्ला केल्याची खडबड जनक घटना घडली आहे.  त्यात त्यांचे वाहन सुमारे २० फूट अंतरापर्यंत घसरत गेले व त्यानंतर ट्रॅक्टर पलटी झाले. या घटनेची नायब तहसीलदार भांदक्कर यांच्या तक्रारीवरून आरोपी  विलास भागवत याला भद्रावती पोलिसांनी अटक करून ट्रॅक्टर क्र एम एच ३४ बी जी २३४३ ताब्यात घेतले आहे. 

प्राप्त माहितीनुसार तहसीलदार याना तालुक्यातील एका घाटावर रेती तस्करी हि सुरु असल्याची माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी आपले पथक घेऊन पारोधी मार्गे चंदनखेडा गाठले. त्या दरम्यान त्यांना विलास भागवत वय ४० वर्ष रा- चंदनखेडा  यांचे ट्रॅक्टर क्र एम एच ३४ बी जी २३४३ आढळून आले. त्यांनी ते ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले. चालकाने ट्रॅक्टर थांबवून आपल्या मजुरांना खाली उतरण्यास सांगितले. मात्र विलास भागवत याने स्वतः ट्रॅक्टर चे स्टेरिंग हातात घेऊन तहसीलदार यांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली. त्यात ते वाहन २० फुटापर्यंत घसरत गेले. यात तहसीलदार सोनवणे यांना हाताला गंभीर दुखापत झाली. सध्या त्यांचा उपचार सुरु आहे. शंकर भांदक्कर नायब तहसीलदार  यांचे तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.