चंद्रपूर (वि.प्र.) :श्री चंडिका नागरी सहकारी पत संस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधरण सभा रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी संताजी सभागृहात पार पडली. संस्थेच्या नियमित कर्ज फेड करणा-या च संस्थेत बहुमोल ठेवी ठेवून योगदान देणा-या सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार कारण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवेंद्र बेले होते. मंचावर संस्थेचे संस्थापक किष्णा कोहाड, उपाध्यक्ष राजेश झोडे, मानद सचिव सौ. सविता कोहाड, संचालक बबन वाघाडे, महेश सहस्त्रबुध्दे, विजय हेडावू, सुनिल धकाते, प्रभाकर खंडाळे, हितेश येरणे, विनोद धकाते, सौ. किर्ती चवरे, प्रमुख अतिथी श्री अॅड. खेळकर साहेब, अंकेशक श्री देशट्टीवार साहेब उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी संस्थेच्या आर्थिक वर्षात दिवंगत झालेल्या संस्थेच्या सदस्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
संस्थेच्या मानद सचिव सौ. सविता कोहाड यांनी संस्थेच्या कार्याच्या अहवाल वाचन केले. संस्थेचे संस्थापक श्री किष्णा कोहाड यांनी संस्थेच्या समग्र अहवालाचे व हिशोब पत्रकाचे वाचन करून सभेपुढे मंजुरीसाठी ठेवले. सभेत सर्व ठरावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष श्री देवेंद्र बेले म्हणाले संस्थेला नियमाकुल ठेवून प्रगतिपथावर नेण्याचे मनोदयही त्यांनी व्यक्त केला. भविष्यात सामाजिक दायित्व समजून समाजकार्यात योगदान देण्यात येईल.
आपल्या संस्थेमुळे अनेकांना आर्थिक सहाय्य, लहान-मोठ्या गरजांसाठी कर्जसुविधा, बचत योजनांचा लाभ मिळत आहे. सदस्यांचा विश्वास हीच आपली खरी संपत्ती आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात पतसंस्था केवळ आर्थिक मदत करणारी संस्था नसून, सामाजिक जाणीव निर्माण करणारे केंद्र ठरावी हा आपला प्रयत्न आहे. आगामी काळात संस्था अधिक बळकट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक पारदर्शक व सुलभ सेवा तसेच समाजातील दुर्बल घटाकांना मदत या गोष्टीवर आपला भर राहील. आपल्या प्रत्येक सदस्यांचे सहकार्य, प्रामाणिकपणा आणि एकजुटीमुळे आपली संस्था प्रगतिपथावर राहील असा मला विश्वास आहे असे सागितले. शेवटी सर्व सभासदस्यांना लाभांश वाटप केले व सर्व सभासदांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
