कोविड -19 विषाणू व शेतकरी आत्महत्यामुळे मृत्यूमुखी झालेल्या व्यक्तींच्या विधवा महिलांचा संयुक्त मेळावा!

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध - विद्युत वरखेडकर      

बल्हारपूर (का.प्र.) - मिशन वात्सल्य योजने अंतर्गत कोविड -19विषाणूंमुळे व शेतकरी आत्महत्यामुळे मृत्यूमुखी झालेल्या व्यक्तींच्या विधवा महिलांचा मेळावा आज गुरुवार दि.७जूलै २०२२ला बल्हारपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात   आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपविभागीय अधिकारी डॉ.दिप्ती सुर्यवंशी- पाटील यांनी विभुषित केले होते.तर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूरच्या अपर जिल्हाधिकारी श्रीमती विद्युत वरखेडकर या प्रामुख्याने उपस्थित होत्या . कार्यक्रमाच्या आरंभी बल्हारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातुन शासनाच्या राबविण्यात येणा-या सर्व शासकीय योजनांची माहिती दिली.दरम्यान याच  मेळाव्यात अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांचे हस्ते आत्महत्या केलेल्या 3 शेतकऱ्यांच्या विधवा  महिलांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदानाचे धनादेश वाटप करण्यांत आले . दुपारी १२:३०वाजता पासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात विविध विभागाच्या अधिकारी वर्गांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करीत विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी बोलताना मा. अतिरिक्‍त जिल्हाधिकारी यांनी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून तालुक्यातील सर्व विभागाने यासाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करून दर पंधरवड्यात तहसीलदार यांनी आढावा घ्यावा असे निर्देश दिले. या मेळाव्यात प्रामुख्याने श्री शशिकांत मोकाशी ngo, उद्योजकता स्किल्स ट्रेनर यांनी महिला सक्षमीकरण करण्यासाठी शासनाने केलेल्या अनेक उपाययोजना  व त्याचे फायदे याबाबत  सविस्तर माहिती दिली. तहसील कार्यालय आणि महिला, बालकल्याण विभागाच्या  वतीने आयोजित  या  मेळाव्याला बल्हारपूर येथील श्री किरण धनवाडे प.स.गट विकास अधिकारी , श्री गजानन मेश्राम वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, श्री रमेश टेटे बालविकास प्रकल्प अधिकारी शहरी, श्रीमती रिना  सोनटक्के प्रभारी cdpo ग्रामीण, श्री लामगे प.स.गट शिक्षणाधिकारी, तालुका विधी सेवा प्राधिकरण,श्री जयवंत काटकर सहा मुख्याधिकारी, नगर परिषद, श्री शैलेश ठाकरे पोलिस  निरीक्षक, श्री मामीडवार तालुका आरोग्य अधिकारी, श्री जोशी सहा. अभियंता बांधकाम विभाग, रणरागिणी फाऊंडेशन च्या श्रीमती स्नेहा भाटिया, श्रीमती रामटेके उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे संचालन श्रीमती देवगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती रोशनी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी तहसील कार्यालय व पंचायत समिती येथील श्री सतीश साळवे नायब तहसीलदार, कु. प्रियंका खाडे पुरवठा निरीक्षक, श्री अजय गाडगे लिपिक, श्री अजय साखरकर जिल्हा समन्वय अधिकारी, महिला बालकल्याण व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".