विवेकानंद महाविद्यालयाने काढली जनजागृती रॅली..!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विवेकानंद महाविद्यालयाने काढली जनजागृती  रॅली..!

भद्रावती (ता.प्र.) - विवेकानंद महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग, सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालय परिसरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नामदेव उमाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राचार्य डॉ. उमाटे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यात देशभक्ती, राष्ट्रभक्ती ची भावना वृध्दिंगत व्हावी.समाजात जागृती व्हावी यासाठी एका प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.ही रॅली शहरातील काही भागात फिरविण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी हातात तिरंगाध्वज उंच धरून राष्ट्रभक्ती च्या घोषणा दिल्या. वंदे मातरम्, स्वातंत्र्य दिन चिरायू होवो ,जय जवान जय किसान, हर घर झेंडा इत्यादी घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. यावेळी विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. या रॅलीमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी तथा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".