बल्लारपुर (का.प्र.) - गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या सिनेट निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अनेकांनी आपले भवितव्य आजमावण्यासाठी या निवडणुकीकरिता सिनेटर साठी फॉर्म भरलेले आहे. ही निवडणूक 4 सप्टेंबरला होणार आहे.गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या सिनेट साठी मॅनेजमेंट कौन्सिल मधून सन्मा.स्वप्नील वसंतराव दोंतुलवार (चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ,बल्लारपूर) यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. मागील पाच वर्षात त्यांनी विद्यापीठाचे भरीव कार्य केले, त्याचीच पावती म्हणून यावेळी त्यांना अविरोध निवडून दिला गेले. त्यांच्या या अविरोध निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निवडीबद्दल चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे समस्त संचालक मंडळ व तसेच आदींनी तसेच प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तथा चंडिका एक्स्प्रेस ची संपूर्ण टीम व गणेश रहिकवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.