सम्यक म्युझिकल ग्रुप तर्फे 'अब तुम्हांरे हवाले वतन साथीओं ' ७५ व्या स्वातंत्र्य अमुत महोत्सव दिनानिमित्त देशभक्तीपर गितांचा बहारदार नजराणा..!
नागपूर (वि. प्र.) - सम्यक म्युझिकल ग्रुप तर्फे ७५ व्या स्वातंत्र्य अमुत महोत्सव दिनाच्या निमित्ताने देशभक्ती पर जुन्या व नव्या गितांचा सदाबहार ' अब तुम्हांरे हवाले वतन साथीओं' कार्यक्रम हिंदी मोरभवन येथिल अर्पण सभागृहात पार पडला.याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात आमंत्रित विशेष अतिथी आयु.विलास गजभिये ,संचालक दै.बहुजन सौरभ यांचे स्वागत आयोजक आयु.मिलींद डांगे व सम्यक म्युझिकल ग्रुप, नागपूर चे मुख्य प्रवर्तक आयु.सुधीर वाळके यांनी पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.देशभक्ती पर गितांची सुरुवात 'ऐ मेरे वतन के लोगो' या गिताला आयु.प्रतिभा गणवीर यांनी गायले.'अपनी आजादी को हम हरगिज मिटा' हे गित आयु.विलास बागडे यांनी गायले.'ऐ मेरे प्यारे वतन' आयु.प्रभाताई यांनी सादर केले.'जिंदगी मौत न बन जाये'हे सदाबहार गित आयु.मिलिंद डांगे यांनी गायले.'होठो पे सच्चाई,होती है' हे गित आयु.रामानंद शामकुवर यांनी सादर केले.'इंसाफ की डगर पे बच्चो दिखावो चलके..'गायक- आयु.शंकर मेश्राम,वंदना धाबर्डे व माधुरी वंजारी.'मेरा रंग दे बसंती चोला'हे गित आजचे आमंत्रित गायक सुरज मालवी यांनी सादर केले.'ऐ देश विर जवानों का'हे गित आयु.अशोक सहारे यांनी गायले.'सुनो गौरसे दुनिया वालो'हे गित आयु.सोपान डोंगरे व माणिक नगराळे यांनी गायले.यासोबतच अनेक जुनी व नवी देशभक्ती पर गित आयु.आनंद जाधव,उषा काटकर,वर्षा शेंडे, जयश्री रहाटे ह्यदयांश जनबंधू,स्वाती थोरात,अमोल भगत,सुनंदा गायकवाड व भाविका जनबंधू यांनी सादर केलीत.या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण'ऐ वतन,वतन आबाद रहे तो' या गितावर आयु.अंकिता गायकवाड यांनी डांस सादर केला.
या कार्यक्रमाचे यशस्वी सुत्रसंचालन आयु.अनिता जनवादे तर आभार आयु.प्रभाताई वासनिक यांनी केले.या कार्यक्रमाला प्रामुख्याने आयु.सतिश जिवने,संजय अंबादे,राजेश जनबंधू व इतर अनेक श्रोतेगण उपस्थित होते.