शिक्षक भारती चंद्रपूर ची सहविचार व विजय संकल्प सभा!

भद्रावती (ता.प्र.) - आज चंद्रपूर येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात शिक्षक भारती  चंद्रपूर ची जिल्हा, तालुका तसेच मुख्य पदाधिकारी यांची सहविचार सभा आयोजित केली. ही  सभा शिक्षक भारती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष  श्री राजेंद्र झाडे यांचे अध्यक्षतेत संपन्न झाली.सभेत शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली. राजेंद्र झाडे यांना विधानपरिषदेत निवडून देणे म्हणजे आमदार कपिल पाटील यांचे हात बळकट करणे यावर उपस्थित पदाधिका-यांनी मनोगतात व्यक्त केले.येणाऱ्या निवडणुकीत श्री राजेंद्रजी झाडे यांना शिक्षक आमदार म्हणून निवडून आणण्याचा या सभेत संकल्प करण्यात आला. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच माध्यमिक शिक्षणाधिकारी व उपसंचालक नागपूर यांचेकडे कडे संघटनेची मिटींग लावली जाईल. ज्यांना वैयक्तिक समस्या असतील त्यांनी आपल्या परिसरातील पदाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात तक्रार द्यावी , असे आवाहन करण्यात आले.गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणूकीत शिक्षक भारतीने सेक्यूलर परिवर्तन प्यानलला पाठींबा जाहीर केला व पाठींब्याचे पत्र राजेंद्र झाडे यांनी परिवर्तन प्यानलच्या प्रमुख पदाधिका-यांना सुपूर्द केले.

याप्रसंगी नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर, राज्य संघटक सचिव किशोर वरभे, विभागीय कार्यवाह सपन नेहरोत्रा, विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे, गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणूकीत सेक्यूलर परिवर्तन पैनलचे निमंत्रक डॉ.सुधाकर पेटकर, डॉ.प्रमोद शंभरकर, शिक्षक भारती चंद्रपूर चे माध्यमिक जिल्हाध्यक्ष भास्कर बावनकर, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम टोंगे, कार्यवाह राकेश पायताडे, उच्च माध्यमिक महा. जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश हटवार, चंद्रपूर शहर अध्यक्ष किशोर दहेकर, कार्यवाह गंगाधर खिरटकर, मुख्याध्यापक संघ अध्यक्ष अनिल वासेकर, आश्रमशाळा जिल्हाध्यक्ष बजरंग जेनेकर, प्राथमिक विभागीय सल्लागार रावण शेरकुरे, राबिन करमरकर, महिला अध्यक्ष रोहिनी मंगरुळकर तथा सिनेट निवडणूकीतील उमेदवार आदी उपस्थित होते.संचालन विलास खडसे, प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष पुरुषोत्तम टोंगे, आभारप्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष बंडू बरडे यांनी केले. या सभेला शिक्षक भरती संघटनेचे सर्वच तालुक्यातील प्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.सहविचार सभेला शिक्षक भारती चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकारी तथा समविचारी संघटनांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.