वाणिज्य भाषा अभ्यास मंडळावर डॉ.यशवंत घुमे अविरोध!

भद्रावती (ता. प्र.) - गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे होऊ घातलेल्या विविध विभागांच्या निवडणुकीत वाणिज्य भाषा अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत डॉ. यशवंत घुमे यांची अविरोध निवड झाली आहे. डॉ. घुमे हे मागील 26 वर्षापासून भद्रावती येथे कार्यरत असून यापूर्वीही दोनदा त्यांना या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. भद्रावतीच्या  प्रगतीत शैक्षणिक क्षेत्रासाठी ही निवड महत्वपूर्ण समजली जाते. शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.