प्रशासनातर्फे ही आमच्याकडे काही लक्ष देण्यात येत नाही..!

भद्रावती (ता.प्र.) - आज दि. 13/08/2022 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे पिंपरी ता.भद्रावती येथील पुरग्रस्थ भागात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेउन त्यांच्या समस्या जानुन घेतल्या, समस्त गावकऱ्यांनी सांगितले की शेतीचं भरमसाठ नुकसान झालेलं आहे व प्रशासनातर्फे ही आमच्याकडे काही लक्ष देण्यात येत नाही. शासनातर्फे नुकसान भरपाईची रक्कम 13500 एवजी वाढवून दिल्ली सरकार प्रमाणे 50 हजार रुपये हेक्टर भरपाई नुकसान देण्यात यावे अशी मागणी समस्त गावकऱ्यांनी केली. पूरग्रस्तांन करिता आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे भोजन व्यवस्था करण्यात आले समस्त गावकऱ्यांनी आम आदमी पार्टी चा आभार मानले यावेळी उपस्थित पदाधिकारी तालुका  अध्यक्ष सोनल पाटिल,तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर, तालुका सचिव सुमित हस्तक, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, मीडिया प्रभारी मृणाल खोबरागडे, शितील म्हैसेकर, Adv. ठेंगणे, सुधिर धांगडे, आशिष तांडेकर, सुरज शहा, श्रीकृष्ण वरखडे, जयंत भाऊ, महेंद्र भाऊ, बाळू बांदुरकर, अतुल रोडगे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".