समाज संघटन महत्वाचे - डॉ. रामदास आंबडकर

जिल्हा स्तरीय गुणवंत गौरव व सायकल वितरण सोहळा थाटात संपन्न .. संताजी शिक्षण प्रसारक मंडळाचा अभिनव कार्यक्रम..

भद्रावती (ता. प्र.) - चांदा जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षी अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव व आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण कार्यक्रम संताजी वस्तीगृह, मुल रोड, चंद्रपूर येथे नुकतेच संपन्न झाले . याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रामदास आंबटकर आमदार यांनी मार्गदर्शन करताना "समाज संघटन महत्त्वाचे असून शैक्षणिक प्रगती साधत विकास करणे" आवश्यक असल्याचे नमूद केले.चंद्रपूर येथील 'चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक मंडळा' द्वारा जिल्हास्तरीय गुणवंत गौरव सोहळा तसेच समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना सायकल वितरण समारोह नुकताच संपन्न झाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र विविध प्रकारे साजरा होत असतानाच, संस्थेच्या वतीने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . चंद्रपूर जिल्ह्यातील तेली समाजातील विविध क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तेली समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास होतकरू विद्यार्थ्यांना सायकल वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. रामदासजी आंबडकर आमदार विधान परिषद तथा प्रदेश सरचिटणीस भाजपा महाराष्ट्र हे लाभले , तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री अजय गुल्हाने साहेब जिल्हाधिकारी, चंद्रपूर डॉ. सुनीता कुंभलकर प्राध्यापक हृदयरोग विभाग एम्स , नागपूर तसेच डॉक्टर दिनकर कुंभलकर नागपूर डॉ. वासुदेवराव गाडेगोणे संस्थाध्यक्ष चंद्रपूर हे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्रात सर्वोत्तम समजली जाणारी "आचार्य" पदवी प्राप्त ३ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच वैद्यकीय शिक्षणात प्राविण्य प्राप्त, अभियांत्रिकी शास्त्र , विविध विषयांत पदव्युत्तर शिक्षण, विविध पदवी , पदवीका , बारावी व दहावी या परीक्षांमध्ये प्राविण्य प्राप्त अनेक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. तेली समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास पण होतकरू गुणवंत अशा 15 विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले . मान्यवरांच्या हस्ते डॉ.सुनीता कुंभलकर यांचा समाजसेवेची व योगदानाबद्दल आमदार डॉ. रामदासजी आंबटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उल्लेखनीय कार्याचे अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन श्री.श्याम धोपटे सहसचिव यांनी केले. कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन श्री रमेशजी भुते सचिव यांनी केले .या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त करणारे प्राप्त करणारे विद्यार्थी, पालकांसह हजारोंच्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".