बल्लारपुर (का.प्र.) - हर हर शंभू या प्रसिध्द गाण्याची सुप्रसिध्द गायिका अभिलिप्सा पांडा आणि सुप्रसिध्द देवी जागरणकार अजित मिनोचा हे माता महाकाली महोत्सवात सहभाग घेणार आहे. 1 ऑक्टोंबरला देवी जागरणकार अजित मिनोचा यांचे जागरण तर 2 ऑक्टोंबरला निघणारा श्री. माता महकाली नगर प्रदक्षिणेत गायिका अभिलिप्सा पांडा यांचा रोड शो असणार असल्याची माहिती माता महाकाली सेवा समीतीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे. 1 ऑक्टोंबर पासुन चंद्रपूरातील महाकाली मंदिर पटागंणात आयोजित माता महाकाली महोत्सवातील कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. 4 ऑक्टोंबर पर्यंत चालणाऱ्या या महाकाली महोत्सवाला महाकाली भक्तांचा मोठा सहभाग लाभत आहे. 1 ऑक्टोंबरला शनीवारी सायंकाळी जबलपूर मध्यप्रदेश मधील सुप्रसिध्द देवी गीत जागरणकार अजित मिनोचा यांचा जागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या सोबत ईशांत मिनोचा हे ही देवी गीतांचे सादरीकरण करणार आहे. तर 2 ऑक्टोंबरला आयोजित श्री. माता महाकाली नगर प्रदक्षिणेत समाज माध्यमांवर धमाल माजवत असलेल्या हर हर शंभू या गाण्याची ओडीसा येथील गायिका अभिलिप्सा पांडा आपल्या संचासह रोडशो मध्ये सहभागी होणार आहे. तरी सदर कार्यक्रमाला महाकाली भक्तांसह चंद्रपूरच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहण माता महाकाली महोत्सवाचे संयोजक यांनी केले आहे.
हर हर शंभू गीत फेम गायिका अभिलिप्सा पांडाचे चंद्रपुरात लवकरच आगमन..!
byChandikaexpress
-
0