भद्रावती (ता.प्र.) - मागिल २० दिवसापूर्वी भद्रावती येथील डिफेन्स वसाहतीत चार वर्षांच्या व दीड वर्षाच्या मुलीवर २ वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचा हल्ला झाल्याने वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.विभागीय वनाधिकारी खाडे, चंद्रपूर तसेच चौरे सहा वनसंरक्षक चंद्रपूर यांचे सूचनेनुसार वनविभाग वन परिक्षेत्र अधिकारी शेंडे आणि क्षेत्र सहायक अधिकारी विकास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २० दिवसापासून बिबट्याच्या पकडण्यासाठी पिंजरे आणि कॅमेरे लावण्याचे पर्यंत प्रयत्न करीत होते.शेवटी काल रात्री कॅमेरा ची पाहणी करण्यासाठी गेले असता बिबट पिंजऱ्यात बंदिस्त झालेला दिसला. यावेळी बीट अधिकारी गेडाम, सार्ड संस्थेचे सदस्य अनुप येरने, श्रीपाद बाकरे, अमोल कुचेकर, आशिष चाहकाटे, शैलेश पारेकर, सोनू कूचेकर, प्रणय पतरंगे, इम्रान पठाण व सार्ड सदस्य आणि वन कर्मचारी वन मजूर याचे मोलाचे सहकार्य मिळाले.त्यानंतर स्थानिक लोकांच्या वाढत्या गर्दी मुळे बिबट्याला त्रास होऊ नये याकरिता पिंजरा घटना स्थळावरून वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा पाहणीत वनविभागाच्या रोपवाटिकेत सुरक्षित ठेवण्यात आला.