भद्रावती (ता. प्र.) - दुसरी राष्ट्रीय महिला मास्तरस अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2022 , तेलंगणा येथील हैदराबाद गुचिबोली स्टेडियम येथे दिनांक ४ ते ६ नोव्हेंबर २०२२ ला पार पडली. या राष्ट्रीय महिला मास्तरस अथलेटिक्स अजिंक्य पद स्पर्धेसाठी भारतातील महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, कर्नाटक, केरला, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, या राज्यातील संघाने सहभाग दर्शविला या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व चंद्रपूर जिल्ह्यातील विवेकानंद महाविद्यालय भद्रावतीच्या प्राध्यापिका संगीता आर. बांबोडे आणि वर्षा कोयचाडे यांनी केले. या स्पर्धेत प्राध्यापिका संगीता आर. बांबोडे यांनी ४०० मीटर धावणे आणि ८०० मीटर धावणे या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले तसेच १५०० मीटर धावणे या स्पर्धेत कास्यपदक प्राप्त केले. याबद्दल प्राध्यपिका संगिता बांबोडे यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. विवेकानंद ज्ञानपीठ ( कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष एडवोकेट मोरेश्वर टेंभुर्डे, सचिव अमन टेंभुर्डे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, प्राध्यापक वर्ग तसेच इतर कर्मचारी सोबतच चंद्रपूर जिल्हा क्रीडा संघटनेचे डॉ. प्रेमचंद, डॉ. राकेश तिवारी, डॉ. दिलीप जयस्वाल, डॉ. अनिस खान, डॉ.चंद्रशेखर कुंभारे, डॉ. अनिता लोखंडे, डॉ. दिलीप बगडे, विजय लांबट, दिलीप मोडक, एडवोकेट मिलिंद रायपुरे, संतोष निंबाळकर, राजेश मत्ते, युवराज भारती, दिनेश गोंडे, विनोद कावठी, सुनील दैदावार, दुर्गराज रामटेके, योगेश करमनकर, गौतम देवगडे, यांनी अभिनंदन केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूला राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत पदक प्राप्त..!
byChandikaexpress
-
0