भद्रावती (ता.प्र.) - कोरोना काळामध्ये वरोरा मधील प्रहार वाहन चालक मालक संघटनेने केलेल्या कार्याबद्दल, सद्भावना युवा एकता वरोरा, तहसील कार्यालय वरोरा, पोलीस उपविभागीय कार्यालय वरोरा, पोलीस स्टेशन वरोरा, नगरपरिषद वरोरा पंचायत समिती वरोरा, तर्फे 6 नोव्हेंबर 2022 ला कटारिया मंगल कार्यालय वरोरा येथे प्रहार वाहन चालक मालक संघटना वरोरा यांचा सत्कार करण्यात आला. प्रहार वाहन चालक-मालक या संघटनेने कोरोना काळामध्ये जेव्हा अख्खे जग थांबलेले होते. अशा काळात गरजूंना अन्य धान्याची किट वाटप करून व याच प्रकारे गरजूंना काही गरजेच्या वस्तूंचे वाटप करून संपूर्ण कोरोना काळात खूप मोठे मोलाचे सामाजिक कार्य पार पाडले. याच गोष्टीची दखल घेत सद्भावना युवा एकता वरोरा यांनी प्रहार वाहन चालक मालक संघटना वरोरा यांचा सत्कार केला.
या या कार्यक्रमामध्ये सत्कारमूर्ती म्हणून यतीश देशमुख ए एस पी हिंगोली, लक्ष्मणराव गमे सर्वाधिकारी गुरु आश्रम मोझरी, व उद्घाटक आयुष निपाणी पोलीस उपविभागीय अधिकारी वरोरा, हे होते. प्रमुख अतिथी म्हणून रोशन मकवाने तहसीलदार वरोरा, गजानन भोयर मुख्याधिकारी नगरपरिषद वरोरा, संदीप गोडसेवार संवर्ग विकास अधिकारी वरोरा, दीपक खोब्रागडे ठाणेदार पोलीस स्टेशन वरोरा हे होते.