श्री माता कन्यका सेवा संस्थेच्या वतीने मुल तालुक्यातील राजोली येथे भव्य नेत्रचिकित्सा शिबिर संपन्न..!
२००० नागरिकांची नेत्र तपासणी, ७२५ नागरिक चष्म्याचे लाभार्थी, १५० नागरिक मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी सेवाग्रामला रवाना..!
वने, सांस्कृतीक कार्य, मस्त्यव्यवसाय तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नेत्र चिकित्सा शिबिराचे यशस्वी आयोजन..!
बल्लारपुर (का.प्र.) - रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे, असे मानुन बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मुल तालुक्यातील राजोली व परिसरातील ग्रामस्थांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या नेत्र तपासणी शिबिराचा हजारो गरिब व गरजु नागरिकांनी लाभ घेतला.
दिनांक ०६ नोव्हेंबर २०२२ रोजी मुल तालुक्यातील नवभारत विद्यालय राजोली येथे श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर द्वारा आयोजित वने, सांस्कृतीक कार्य, मस्त्यव्यवसाय तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नेत्रचिकीत्सा शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या गुरनुले, राजोली येथील गजानन वलकेवार, सुरेश ठिकरे, श्री माता कन्यका सेवा संस्थेचे सचिव राजेश्वर सुरावार, शैलेंद्रसिंह बैस, सचिन गेडाम, श्रीधर पाकमोडे, चंद्रकांत नामपल्लीवार, डोंगरगांव येथील रविंद्र मेश्राम, चिखली येथील प्रमोद कडस्कर, नवेगाव आलेवाही येथील वासुदेव वाघ, गोलाभुज येथील रघुनाथ गावंडे, मुरमाडी येथील संतोष कुळमेथे, ताडभुज येथील आशिष वाकुडकर, गांगलवाडी येथील विनोद चांभारे, सचिन सिडाम यांची उपस्थिती होती. नेत्र तपासणीचे कार्य कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम येथील चमूने केले.
या शिबिरामध्ये २००० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यामधून ७२५ लोकांना १८ नोव्हेंबर २०२२ रोजी चष्मे वितरीत करण्यात येणार आहे. यावेळी १५० नागरिकांना मोतीबिंदु झाल्याचे निदान झाले. त्यामधून ५९ नागरिकांना मोतीबिंदुच्या शस्त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथे पाठविण्यात आले, असुन उर्वरित नागरिकांना दिनांक ८ आणि १० नोव्हेंबर २०२२ रोजी सेवाग्राम येथेच शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे. शिबिराला कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम येथील नेत्रतज्ञांच्या चमुच्या माध्यमातुन नेत्रचिकित्सा करण्यात आली. यापुर्वीही श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले असुन सुमारे ४२ हजाराच्यावर नागरिकांना मोफत चष्मे वितरीत करण्यात आले असुन १७ हजाराच्या वर मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. विकासकामांचा झंझावात सुरु असतानाच सामाजिक जाणीव जपत अनेक आरोग्य शिबिरांचे सातत्याने आयोजन करण्यात येते आहे. चंद्रपूर जिल्हयातील मुल तालुक्यातील राजोली व परिसरातील ग्रामस्थांनी श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे यावेळी आभार मानले आहे.