रामाळा तलाव संरक्षण व संवर्धन संघटन, चंद्रपूर रामाळा तलाव जनचळवळ .!

चंद्रपूर शहरातील एकमेव रामाळा तलावाला वाचवण्यासाठी त्वरीत उपाय योजना करण्यासाठी विनंती अर्ज .! 

चंद्रपुर (वि.प्र.) : चंद्रपूर शहराच्या मध्य भागात रामाळा तलाव बसलेले आहे. चंद्रपूर, राजा खांडक्या बल्लारशाह यांनी तलावाची निर्मिती केली आणि पुढे रामशहा यांनी तलावाचे मित बांधून फरसबंदी केली. त्यांच्याच नांवावर या तलावाला रामाळा असे नांव देण्यांत आले आहे. या तलावाच्या मुख्य पाण्याचा स्त्रोत हा मच्छी नाला आहे. या नद्यातील मासोळया अतिशय प्रसिध्द अणि चवदार असल्यामुळे, या नद्याला मच्छी नाला असे नांव मिळाले असले. या तलावावर वाल्मिकी मच्छवा संस्थेचे सभासद मासेमारी करतात. ही संस्था 1956 वर्षी स्थापन झालेली आहे. या संस्थेच्या 300 सदस्यांची आणि कुटुंबांची उपजीविका रामाळा तलावावर अवलबून आहे. या तलावाची व्यथा आम्ही खालील प्रमाणे मांडत आहोत.
1. रामाळा तलावाचा आकार एकेकाळी 158 एकर इतका मोठा होता, सध्याच्या स्थितीत रामाळा तलाव फक्त 92 एकर पर्यंत शिल्लक राहिले आहे. चारही बाजूने झालेली अतिक्रमण याची कारण आहे. 1905 च्या सुमारास रामाळा तलावाच्या मधोमध रेल्वेची लाईन गेली आणि त्यामुळे तलावाचे दोन तुकडे झाले. यानंतर तुकडयाच्या डावीकडील भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले, तलावाच्या जवळ एक छोटेसे जलनगर विकसित झाले.
2. या तलावाच्या वर आणखी एक तलाव होता ज्याचं नाव लेंढारा असा होता. हा तलाव अतिक्रमणामुळे पुर्णतः नष्ट झालेला आहे. वीस पंचवीस वर्षांच्या पूर्वी तलावात रामाळा उद्या ानाची स्थापना झाली, आणि तलावाचा मोठा भुभाग बुजवला गेला. शहराती दोन्ही बाजूस असलेल्या नागरीकरणे
तलावाच्या परिकाम क
संपूर्ण गटाराचे पाणी रामाळा तलावात येत असल्यामुळे पाण्याची गुणवत्ता खराब झाली आणि तलावात इकॉर्निया कैसिपस मोठ्या प्रमाणात वाढली.
3 जलनगरच्या भागाकडून दरवर्षी एक एक मकान तलावात बनवत आहे. त्यामुळे रामाला तलावाचा धोका आजही संपलेला नाही. सध्या रामाळा तलावाच्या भागात दोन घराचे बाधकाम सुरू आहे, या दोन घरांच्या बांधकामांना थांबवणे नितांत गरजेचे आहे. आम्ही आपणास विनती करतो की प्रत्यक्ष रामाळा तलावात जाऊन या अतिक्रमणाची पाहणी करावी, व हे बांधकाम अवैध असल्यास ते त्वरित थांबवावे.
4. चंद्रपूर गोड राजांचे हे राजधानीचे शहर आहे, या शहरात गौरी, कोनेरी, घुटकाळा, तुकूम, लेढारा, लाल तलाव अशी अनेक तलाव होती, परंतु मागील अनेक वर्षापासून लोकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे चंद्रपूर शहरातील फक्त रामाळा एकमात्र तलाव आता शिल्लक राहिलेला आहे. रामाळा तलाव सुध्दा आत्ता आपल्या शेवटच्या घटका मोजतोय असे दिसत आहे.
5. या तलावात शहरातील गटाराचे पाणी येत असल्यामुळे तलावातील संपुर्ण पाणी प्रदुषित झाले आहे, रामाला तलावाच्या उत्तरेला असलेल्या रेल्वे कडील माल धक्क्याकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचे पाणी तलावात येत असल्यामुळे तलावातील नायट्रोजनचे प्रमाण वाढतेय आणि त्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणात इकोर्निया कॅसिपस ही बनस्पती वाढीला लागते. याशिवाय याच तलावात मोठ्या प्रमाणात विविध देवा- देवतांचे विसर्जन सुध्दा होत असते. या सर्वामुळे रामाळा तलाव हा प्रदुषित झालेला आहे. याशिवाय तलावाच्या शेजारी असलेल्या किल्लयाच्या भिंती कोसळलेल्या आहेत त्यामुळेही रामाला तलावाच्या सौदर्योकरनाला आळा बसलेला आहे.
तलावाच्या पोटात जलनगरच्या परिसराकडून दरवर्षी बांधल्या जाणा-या घरांना परवानगी देऊ नये, तलावाच्या पात्रातील अतिक्रमण असल्यास त्या अतिक्रमणाला महानगरपालिकेच्या वतीने त्वरीत हटवले जावे,
2 रामाळा तलावाकडे मच्छी नाला कडून येणारे सांडपाणी डायवर्ट करणे, मच्छीनाला जिथे रामाळा तलाव ला येऊन मिळतो त्या ठिकाणी वॉटर ट्रीटमेंट प्लांट बसवणे. तलावाच्या खराब झाली
दोन्ही बाजूस असलेल्या नागरी वस्तीतील सांडपाणी तलावात येणार नाही याची व्यवस्था करणे
3. तलावाच्या पश्चिम दिशेस अतिक्रमणाची मोळी समस्या असल्यामुळे तिथे संरक्षण मितीचे काम करणे, ही संरक्षण भिंत जास्त रुंद केल्यास या भिंतीवरूनच मोटारी आणि दुचाकी पाहने रेल्वे लाईनच्या खलून वाहतूक वळवून ती आरटीओ कार्यालयाकडे आणली जाऊ शकते. यामुळे जटपुरा गेटवरील वाहतुकीच्या ताण कमी होईल.
4 दरवर्षी रामाळा तलाव सुमारे दुर्गामुर्ती विसर्जन कायमचे बंद करून इरई नदी पात्रात त्याची व्यवस्था करून घेणे.
5. रेल्वे मालधक्का वरून रासायनिक खते चढ-उतार करताना पावसाच्या पाण्यासोबत येणारे रासायनिक खत तलावात येणार नाही यावर कार्य करणे, यासाठी रेल्वे विभागाकडून बरेक चे कार्य करणे.
6. रामाळा तलावाचे खोलीकरण यानंतर वेकोलिचे सातत्याने मुगर्भातील फेकण्यात येणारे पाणी तलावात आणणे,
7. रामाला तलावातील प्रदुषणाचे स्त्रोतांचा अभ्यास करून तलावाचे पर्यावरण अबाधित ठेवण्यास संबंधित विभागांना बंधनकारक करणे.
8. रामाळा तलावाच्या आतून चंद्रपूर जिल्हा परकोटाच्या भिंतीस लागून असलेल्या झाडी झुडपे वृक्ष काढून किल्ला भितीचे संरक्षण करणे.
सद्यास्थितीत, रामाळा तलावातील तथा परिसरातील अवैध बांधकामांचे अतिक्रमण त्वरित थांबविणे ही आजची रामाळा तलाव सुरक्षित करण्याची प्रथम नितांत आवश्यकता आहे. सदर बाबत तात्काळ कार्यवाही करण्यांत यावी या नम्र विनंतीसह अभिवेदन सादर करण्यांत येत आहे. पुढील सविस्तर चर्चेसाठी वेळ देण्यांत यावा, ही नम्र विनंती.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.