भद्रावती (वि.प्र.) - स्थानिक भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचे संस्थापक सचिव तथा माजी आमदार स्व निळकंठराव यशवंतराव शिंदे यांना भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती अंतर्गत सर्व प्राथमिक शाळा, विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालय व सर्व वरिष्ठ महाविद्यालयातर्फे निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी तृतीय पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली अर्पणाचा कार्यक्रम पार पाडला.
या श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था , भद्रावतीचे अध्यक्ष डॉक्टर विवेक शिंदे, सचिव, डॉक्टर कार्तिक शिंदे, सहसचिव, डॉ. विशाल शिंदे, प्राचार्य डॉक्टर जयंत वानखेडे व प्राचार्य डॉक्टर एल. एस. लडके उपस्थित होते.
सर्वप्रथम सर्व उपस्थितांनी स्व. निळकंठराव य. शिंदे यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण व पुष्प अर्पण करून दोन मिनिटाचा मौन पाळून श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाची सुरुवात सुरुवात झाली.
याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर एल. एस. लडके यांनी आपल्या भावना व्यक्त करीत स्व. निळकंठराव शिंदे यांच्या जीवनाविषयी व कार्याविषयी माहिती दिली त्यात त्यांनी सन 1971 मध्ये भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती कशी स्थापन केली व त्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली व तेव्हा चोरा या दुर्गम मागासलेल्या खेडे भागात प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली व त्यानंतर या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची सोय व्हावी याकरिता माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय सुरू करून शिक्षणाची सोय करून दिली यावरच ते न थांबता विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणाकरिता वरिष्ठ महाविद्यालय व त्यानंतर उच्च शिक्षण व संशोधन केंद्राची सुरुवात करून माझ्या संस्थेमधील प्रत्येक विद्यार्थी उच्चविद्या विभूषित व्हावा अशा प्रकारच्या विद्यादानाचा उदांत्त हेतू लक्षात घेऊन चोरा, भद्रावती व वरोरा सारख्या शहरात विविध शैक्षणिक शाखा उघडल्यावर त्याचे वटवृक्षात रूपांतरण झाल्याचे आपणास दिसते यावर सखोल अशी माहिती दिली.
या श्रद्धांजली कार्यक्रमाकरिता भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती अंतर्गत सर्व प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व मुख्याध्यापक सर्व प्राचार्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉक्टर अपर्णा धोटे तर आभार प्रदर्शन प्रा डॉ सुधीर मोते यांनी केले.