भद्रावती (वि.प्र.) : इनरव्हील क्लब भद्रावती तर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्यातील एक उपक्रम भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसुर्ली येथे वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना लेखन साहित्य वितरणाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.
वृक्षारोपण व साहित्य वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रेमा पोटदुखे अध्यक्ष, इनरव्हील क्लब भद्रावती , सुनीता खंडाळकर सचिव, केशनी हटवार, मुख्याध्यापक विना जूनघरे , सपना कातकर अध्यक्ष, शाळा समिती ह्या व्यासपीठावर उपस्थित होत्या.
यावेळी इनरव्हील क्लब भद्रावती तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसुर्ली येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन वृक्ष लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी लागवड केलेल्या वृक्षांची जोपासना करायची ही जबाबदारी विद्यार्थ्यांना वाटून दिली. तसेच शालेय विद्यार्थ्यांना लेखन साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसोबत मुक्त संवाद साधण्यात आला व त्यांच्या शैक्षणिक अडचणी जाणून घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी काव्यवाचन तसेच प्रगट वाचन करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशनी हटवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधीका चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन वर्षा मोहूर्ले यांनी केले. कार्यक्रमाला इनरव्हील क्लब भद्रावतीच्या सदस्या तृप्ती हिरादेवे, स्नेहा कावळे, मनीषा ढोमणे, विश्रांती उराडे, शुभांगी बोरकुटे आदी पदाधिकारी तसेच पालक वर्ग व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.