स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 100 मीटर तिरंगा रॅली भद्रावतीत संपन्न..!
भद्रावती (ता.प्र.) - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम चालू आहेत. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज 15 ऑगस्ट 20022 ला भद्रावती येथे शंभर मीटर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.१०० मीटर तिरंगा रॅली ची सुरुवात यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथुन मा.श्री. प्रशांत शिंदे, डॉ.विवेक शिंदे, रविभाऊ शिंदे , नकुल शिंदे , डॉ.जयंत वानखेडे, आदी मान्यवरांनी हीरवी झेंडी दाखवून केली. भर पावसात या रॅलीला मीळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भद्रावतीत या अनोख्या रॅलीची सर्वत्र चर्चा होत आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऐतिहासिक भद्रावती शहरात विविध शाळा महाविद्यालयात अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल झालेली आहे.
अशातच भद्रावती शहरात एक अनोखा उपक्रम राबवण्याचा मानस 100 मीटर तिरंगा रॅली च्या आयोजक मंडळींनी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर साजरा होत असताना भद्रावती येथे शंभर मीटर लांबीचा तिरंगा विद्यार्थ्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. ही तिरंगा रॅली यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातून निघाली. तिरंगा रॅली मुख्य मार्गाने मार्गक्रमण करत नाग मंदिर परिसरापर्यंत व नागमंदिरातून परत गांधी चौक, नगरपरिषद, आंबेडकर चौकापर्यंत ही रॅली पोहोचली. भर पावसात या तिरंगा रॅलीत हजारो नागरिक ,बंधू ,भगिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.या तिरंगा रॅलीत निळकंठराव शिंदे महाविद्यालयाचे एनसीसी चे पथक व एन एस एस चे पथक समोर होते. यात नीलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय भद्रावती, यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती, यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक विद्यालय ,चिचोर्डी भद्रावती येथील समस्त विद्यार्थी, विद्यार्थीनीं , प्राध्यापक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी ,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विदर्भ साहित्य संघ शाखा भद्रावती चे पदाधिकारी, ईनरव्हल क्लब, रोटरी क्लब , व्यापारी संघटना, पोलिस स्टेशन भद्रावती चे कर्मचारी, विविध सेवाभावी संस्था चे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गोपाल भारती सर पूर्ण वेळ हजर होते. संपुर्ण पोलिस दल बंदोबस्तासह उपस्थित होते. भद्रावती येथील विद्यार्थी , सामान्य नागरिक,समस्त कर्मचारी मोठ्या प्रमाणात या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते.देशभक्तीपर गीतांच्या तालावर, देशभक्तीने प्रेरित होऊन,भर पावसात आबाल वृद्धांच्या शरीरात देशभक्तीचा संचार जागृत करत हजारो नागरिक या सहभागी झाले. व रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिकांनी ही वैशिष्ट्यपूर्ण 100 मीटर तिरंगा रॅली अनुभवली. बॅन्ड पथक ,डीजे पथक,एन.सी.सी पथक व नंतर शंभर मीटर तिरंगाधारी विद्यार्थी ,नागरिक अशी शिस्तबद्ध रॅली शहरातून निघाली .
आंबेडकर चौक येथे सामूहिक राष्ट्रगीत गायन करून रॅली विसर्जित करण्यात आली . येथे देशभक्ती गीत गायनाचा कार्यक्रम करण्यात आला.या रॅलीचे यशस्वी आयोजन प्रशांतभाऊ शिंदे , रविभाऊ शिंदे , संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, डॉ. विवेक शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, सचिव डॉ. कार्तिक शिंदे , सहसचिव डॉ. विशाल शिंदे , नकुल शिंदे, संतोष सामने उपाध्यक्ष न.प.भद्रावती, रोशन कुटेमाटे, इम्रान खान , प्राचार्य डॉ. लाडके , प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे ,डॉ. ज्ञानेश हटवार , डॉ.सुधिर मोते, ज्ञानेश्वर डुकरे, सुधिर सातपुते नगरसेवक,कामरान खान, सुनिल नामोजवार आदींनी मान्यवरांनी केले .


