संत गाडगेबाबा विद्यालयात अमृत महोत्सव साजरा..!

भद्रावती (ता.प्र.) - संत गाडगेबाबा विद्यालय, मोहर्ली, ता. जि. चंद्रपूर येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी मा.श्री वामनरावजी कपाट साहेब अध्यक्ष ग्रामविकास तांत्रिक शिक्षण प्रसारक संस्था,जेना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वासेकर सर यांनी, तर प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री वामनराव कपाट साहेब,अध्यक्ष ग्रामविकास तांत्रिक शिक्षण प्रसारक संस्था,जेना. तसेच मा.श्री नितेशजी रामटेके साहेब,व्यवस्थापक, एम.टी.डी.सी., मोहर्ली यांनी भूषविले.यावेळी प्रमुख अतिथिंच्या हस्ते भारत मातेचे पूजन करण्यात आले व विद्यालयात घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला,वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा मध्ये प्रथम,द्वितीय,व तृतीय क्रमांक प्राप्त विध्यार्थ्यांना बक्षिसे वितरित करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य महोत्सवाबाबत आपले विचार मांडले. तसेच प्रमुख अतिथीनी सुद्धा विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच मा.श्री वासेकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन जेष्ठ शिक्षक श्री कोरडे सर, यांनी केले तर आभार श्री कौरासे सर, यांनी मानले.कार्यक्रमासाठी श्री पुप्पालवार सर, सौ. शेंडे मॅडम तसेच श्री रमेशजी शेंडे, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकेत्तर कर्मचारी व आजी - माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".