पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई यांच्या विरोधात मांडली आपली व्यथा..!

बल्लारपुर (का.प्र.) - लोकनेते विकासपुरुष मा.ना.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्याकडे इंजि.देवेंद्र वाटकर यांच्या नेतृत्वात असंख्य पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई यांच्या विरोधात मांडली आपली व्यथा.महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने २०२१-२२ या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांचा अनपेक्षित निकाल लागला. या अनपेक्षित निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याच्या मार्गावर असून सदर प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात घडलेला असल्याचे विद्यार्थ्यांचे त्यांचे पालकांचे व शिक्षकांचे म्हणणे आहे.सदर विद्यार्थ्यांची व्यथा आज लोकनेते विकासपुरुष आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे इंजि.देवेंद्र वाटकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांनी मांडला.यावेळी आदरणीय भाऊ यांना निवेदन देऊन या प्रकाराबाबत माहिती सादर करून यावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होणार नाही करिता भाऊंनी ठोस पाऊल उचलून विद्यार्थ्यांना सरकारच्या वतीने न्याय मिळवून देण्याची आग्रहाची विनंती केली. यावर आदरणीय सुधीरभाऊ यांनी उपस्थित असंख्य विद्यार्थ्यांना सकारात्मकपणे उचित मार्गदर्शन करून लवकरात लवकर यावर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ असे विश्वासदर्शक आश्वासन दिले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.