भद्रावती (ता.प्र.) - येथील विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते.यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.बंडू जांभूळकर यांनी प्रास्ताविकातून स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जीवनकार्याचा सविस्तर परिचय करून दिला.यावेळी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्योती राखुंडे, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रकाश तितरे, वाणिज्य विभागातील डॉ.बंडू जांभूळकर, डॉ सुहास तेलंग, इंग्रजी विभागातील डॉ. गजानन खामनकर, प्रा मोहित सावे, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख प्रा. संगीता बांबोळे, ग्रंथालय विभागप्रमुख डॉ. सुधीर आष्टुनकर, इतिहास विभागप्रमुख डॉ.जयवंत काकडे, समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. अमोल ठाकरे, डॉ यशवंत घुमे, तथा कनिष्ठ महाविद्यालयीन विभागातील,प्रा.रामकृष्ण मालेकर,प्रा.खोजराज कापगते, प्रा. धनंजय बेलगावकर, प्रा. नरेंद्र लांबट, प्रा. श्रीकांत दाते, प्रा. अनिल बलकी, प्रा सुहास खोके, प्रा.राजू बैरम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विवेकानंद महाविद्यालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती साजरी.!
byChandikaexpress
-
0