भद्रावती (ता. प्र.) - स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात ग्रंथालयशास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांचे जन्मदिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक ग्रंथ, सामान्य ज्ञान पुस्तके यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला. या प्रदर्शनीला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन लाभ घेतला. प्रदर्शनीस भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रंथपाल डॉ. सुधीर आष्टुनकर यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. शिवाय विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीकडे वळण्यास प्रोत्साहन दिले.तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाअंतर्गत महाविद्यालयातील इतिहास विभागा अंतर्गत विभाजन विभिषिका स्मृतिदिवस पाळण्यात आला. विवेकानंद महाविद्यालयातील इतिहास विभागाद्वारे फाळणीची परिस्थिती, त्यावेळी निर्माण झालेली स्थिती, त्यावेळची राजकीय स्थिती, लोकांची मानसिकता अधोरेखित करणारी चित्र प्रदर्शनी लावण्यात आली. सदर चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नामदेव उमाटे यांनी फित कापून केले. याप्रसंगी विभाग प्रमुख डॉ जयवंत काकडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेकानंद महाविद्यालयात ग्रंथालय व इतिहास विभागाची चित्र प्रदर्शनी..!
byChandikaexpress
-
0