बल्लारपुर (का.प्र.) - काल दि. 18/08/2022 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी चा अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे रणरागिणी हिरकणी फाऊंडेशन तर्फे महिला दहीहंडी ची स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. बल्लारपूर येथील बालाजी वॉर्ड मधील खुल्या पटांगणावर स्पर्धा पार पडली.या आयोजीत स्पर्धेत प्रमुख अतिथी म्हणून सत्यनारायणजी खेंगर,जितेशजी पोपली आणि या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट डायरेक्टर कोमल पोपली, नयन तंबेकर, जानवी निवलकर, रणरागिणी हिरकणी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ. मंजुषा कल्लुरवार व हिरकणी ढोल ताशा पथक चे अध्यक्ष शुभम दवने उपस्थित होते.रणरागणी हिरकानी ढोल पथक यांच्या ढोल ताशांचा गजरात कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.या स्पर्धेत चार संघांनी भाग घेतला -1. श्री राम बाल अखडा, 2. M.J.F. कॉलेज ग्रूप, 3. साईबाबा वॉर्ड ग्रूप, 4. जव्हेरी कॉलेज ग्रूप
या मधून श्री राम बाल आखाडा या संघाने सगळ्यात कमी वेड घेत दहीहंडी फोडून प्रथम क्रमांक पटकावला तर M.J.F. कॉलेज ग्रूप संघाने दुसरा क्रमांक पटकावला . विजेत्या संघाचे रोख रक्कम बक्षीस, कप आणि प्रमाणपत्र प्रमुख अतिथी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.या चालत्या कार्यक्रमांत बल्लारपूर शहरातील हजारो नागरिकांनी आपली उपस्थिती दाखून ह्या कार्यक्रमाचा मान आणखी वाढवला. दरवर्षी जन्माष्टमी चा शुभ अवसरावर महिला दहीहंडी च कार्यक्रम रणरागिणी हिरकणी फाऊंडेशन तर्फे आयोजित करण्यात येत होता , परंतु मागील दोन वर्षे कविड महामारिमुडे रद्द करण्यात आला होता. परंतु या वर्षी त्या गेल्या दोन वर्षांची कसर काढून ही स्पर्धा थाटामाटात साजरे करण्यात आले .