राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला..!

मुंबई (जगदीश काशिकर) - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज मुंबईहून नाशिककडे येत असतांना कसारा घाटात अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ अपघातस्थळी थांबून पाहणी केली,अपघाताची तीव्रता अधिक असल्यामुळे वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला होता.अपघातात मयत झालेल्या वाहनचालकाच्या नातेवाईकांसोबत तात्काळ त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला.उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.