भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय व RAG-I Upcycling चंद्रपूर यांच्यासोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे , उद्घाटक RAG-I Upcycling चंद्रपूरचे संस्थापक डॉ.बी.डी. पालीवाल प्रमुख पाहुणे, सौ डॉ प्रिया शिंदे, सहसचिव प्राध्यापक डॉ.विशाल शिंदे तसेच आयोजक प्राचार्य डॉ. एल.एस.लडके उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे संस्थापक सचिव स्व निळकंठराव शिंदे यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून झाली.सर्वप्रथम सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत कु विभा तातेड व खुशी खरवडे यांच्या स्वागत गीताने झाली. सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी सामंजस्य करार व नव्याने सुरू होत असलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन वेस्ट मॅनेजमेंट याबद्दल सविस्तर माहिती देत या प्रकारचा कोर्स हा सर्वप्रथम या गावात जिल्ह्यात व विद्यापीठात आमचे महाविद्यालयात सुरु होत आहे तसेच वेस्ट मॅनेजमेंट वर सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ प्रिया शिंदे यांनी वेस्ट मॅनेजमेंट मधून चांगल्या गोष्टीची निर्मिती होऊ शकते यावर प्रकाश टाकला तसेच सहसचिव प्राध्यापक डॉ विशाल शिंदे यांनी भद्रावती येथील बुधवार आठवडी बाजार संपल्यानंतर एक व्यक्ती सडका भाजीपाला गोळा करून त्यावर प्रक्रिया करून तो शेडी व मेंढी यांना अन्न म्हणून वापर करतात यावरचा आपला वैयक्तिक अनुभव सर्वांना सांगितला.
यानंतर RAG-I Upcycling चंद्रपूरचे संस्थापक डॉ बी डी पालीवाल चंद्रपूर यांचा भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती व महाविद्यालयाच्या वतीने शाल , श्रीफळ , सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी डॉ पालीवाल यांनी आज जगात सर्वात जास्त प्रदूषण करणारी वस्तू म्हणजे प्लास्टिक होय परंतु याच प्लास्टिक पासून पुन्हा रिसायकलिंग करून नव्याने समाज उपयोगी साहित्य तयार कसे करतात यावर सर्वांना मार्गदर्शन करीत त्यांनी प्लास्टिक पासून तयार करण्यात आलेल्या सर्व वस्तू ज्या प्लास्टिक बेंचेस, कवेलू , टाइल्स, गट्टू , विटा इत्यादी प्रत्यक्षात दाखविल्या. तसेच घरातून निघणारे इतर अनावश्यक वस्तू पासून उपयोगी विविध वस्तू कशा तयार कराव्यात याची माहिती दिली.तसेच आज आपला देश विविध क्षेत्रात प्रगती करीत आहे या इलेक्ट्रॉनिक वस्तू मेडिकल इक्विपमेंट्स , थर्माकोल व ई-वेस्ट भरपूर प्रमाणात तयार होत आहे व त्यामुळे जगात देशात विविध प्रकारचे प्रदूषण तयार होत आहे ते कमी करण्यासाठी उपाय व उपाययोजना या प्रकार विस्तृत प्रकाश टाकला व त्यांना याप्रसंगी स्वतः तयार करण्यात आलेल्या वस्तूचे प्रदर्शन दाखविले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे यांनी आजच्या जगात वाढत्या प्लास्टिक प्रदूषण वर चिंता व्यक्त केली परंतु यावर मात करीत डॉ पालीवाल यांच्या सारख्या प्रतिभावंत व्यक्ती प्लास्टिक पोलुशन वर मात करीत त्यापासून कसे विविध वस्तू तयार करतात व त्यांचा उपक्रम कसा समाज उपयोगी आहे व त्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेऊन सहकार्य करायचे आवाहन केले तसेच याकरिता आमच्या शैक्षणिक संस्थेमधील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी हातभार लावतील याची ग्वाही दिली. या कार्यक्रमाचे संचालन सर्टिफिकेट कोर्स इन वेस्ट मॅनेजमेंट चे समन्वयक प्राध्यापक डॉ गजेंद्र बेदरे तर आभार प्रदर्शन Lt.प्रा. सचिन श्रीरामे यांनी केले.याप्रसंगी डॉ पालीवाल यांनी त्यांच्या विविध प्रश्नांच्या जास्तीत जास्त उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्याला सन्मान चिन्ह देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक कुलदीप भोंगळे , प्राध्यापक संदीप प्रधान शरद भावरकर ऋत्विक सोनारखन , शिवम काळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.