अंध विद्यालय, रूग्नालय आणि पोलिस ठाणे येथे फळ, मिठाई वाटुन आम आदमी पार्टी, भद्रावती ने केला वाढदिवस साजरा
भद्रावती (ता.प्र.) - राष्ट्रीय संयोजक आणि दिल्ली चे मुख्यमंत्री आणि आमच्या सार्वांचे आवडते व्यक्तिमत्व सन्माननिय अर्विंदजी केजरीवाल सर यांचा वाढदिवस दिनांक 16 ऑगस्ट ला भद्रावती आम आदमी पार्टी तर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी घोट निंबाळा येथील विद्यालयाला भेट देऊन तेथील अंध विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अंध मुलांच्या हस्ते आणि संपूर्ण कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि विद्यालयाच्या व्यवस्थापनाच्या सहभागाने केक कापुन करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना नाश्ता वितरण करण्यात आला. आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अंध मुलांशी आणि व्यवस्थापनाशी संवाद साधला आणि त्यांना संपूर्णपणे मदत करण्याचा आश्वासन दिलं. कोणती अडचण असल्यास ते आम आदी पार्टीला संपर्क साधावा असे सांगण्यात आले.
त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारी यांनी विद्यालयाचे निरीक्षण केले. त्यानंतर भारत माता की जय, वंदे मातरम्, जय हिन्द जय भारत, अर्विंदजी संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं, आम आदमी जिंदाबाद विधार्थी सम्वेत कार्यकर्त्यांनी उत्साहाने घोषणा देत समरोप करण्यात आला. त्यानंतर सामान्य रुग्नालयाला भेट देऊन तेथील रुगणांना फळ आणि मिठाई वाटप करण्यात आली. तसेच रुग्णांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आणि दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक बद्दल माहिती देण्यात आली. महाराष्ट्रात सुद्धा तसेच मोहल्ला क्लिनिक उभारण्यात आले पाहिजे ही इच्छा नागरिकांनी वर्तवली.
त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बांधवां सोबत मिठाई देऊन अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पोलीस बांधवांनी अरविंद केजरीवाल यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि महाराष्ट्र मध्ये सुद्धा दिल्ली आणि पंजाब प्रमाणे स्वच्छ शासन आणि प्रशासन भ्रष्टाचार मुक्त झालं पाहिजे ही इच्छा व्यक्त केली. या संपूर्ण कार्यक्रमाच्या वेळी सोनाल पाटील तालुकाध्यक्ष आम आदमी पार्टी भद्रावती, सुमित हस्तक तालुका सचिव विनीत निमसरकर, तालुका उपाध्यक्ष राजकुमार चट्टे, कोषाध्यक्ष सुधीर धांगळे, आशीष तांडेकर, किरण ताई धांगळे, सुरज शहा, विजय सपकाळ, शिथिल म्हैस्कर, समुएल गंधम, मृणाल खोब्रागडे, जयंत रंगारी, घनश्याम गेडाम, आदेश फुलझेले, किशोर गायकवाड, राजू कोटा आदि सदस्य उपस्थित होते.

