शिक्षक भारती संघटनेचा सेक्युलर परिवर्तन पॅनलला पाठिंबा..!

 गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट निवडणुक..!

भद्रावती (ता.प्र.) - गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विद्यापीठाची महत्वाची दुसरी सिनेट निवडणूक ही 4 सप्टेंबर 2022 ला होऊ घातलेली आहे . या निवडणुकीत सेक्युलर परिवर्तन पॅनलने सिनेट निवडणुकीसाठी आपले सर्व उमेदवार उभे केले आहेत.  बहुजनांना शिक्षणापासून दूर लोटण्याच्या तथाकथित धोरणाला विरोध करत, सामान्यांना दर्जेदार उच्च शिक्षण देऊन  शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही निवडणूक महत्वपूर्ण आहे.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज , आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज , सर्वसामान्य व स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडे करून देणारे आद्य शिक्षक महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मानवतेचे पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे वं. गाडगे महाराज या महामानवांच्या आदर्शाने प्रेरित होऊन सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व सर्वसामान्य समाजाला शिक्षण मिळवून देण्यासाठी शिक्षणक्षेत्रात आग्रही भूमिका स्वीकारून शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्याच्या विचाराने सेक्युलर परिवर्तन पॅनल गोंडवाना विद्यापीठाची  प्रतिष्ठेची समजली जाणारी ही सिनेट निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना यूनिवर्सिटी टीचर्स असोसिएशन चंद्रपूर,  युवा सेना चंद्रपूर- गडचिरोली , ओबीसी सेवा संघ चंद्रपूर-गडचिरोली, व समविचारी अनेक संघटनांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक ताकतीने लढवीत आहे . 

शासनमान्य शिक्षक भारती संघटनेचे ब्रीदच ,"शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी" हे आहे. संघटनेचे आधारस्तंभ आमदार माननीय कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वात ही संघटना संपूर्ण राज्यात आपल्या कार्याने जनसामान्यांपर्यंत पोहोचली आहे . या संघटनेचा विदर्भातील कार्य विस्तार फार मोठा आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांपर्यंत ही संघटना काम करत आहे . शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक , माध्यमिक , कनिष्ठ महाविद्यालय, आदिवासी आश्रम शाळा, रात्र शाळा , वस्तीशाळा तसेच महाविद्यालय व विद्यार्थ्यांसाठी सर्व स्तरावर सतत कार्यरत आहे‌.गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षक भारती संघटनेची पाळेमुळे सर्वत्र पोहोचलेली आहेत. विदर्भाचा विचार केला असता शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे यांच्या नेतृत्वात शिक्षण क्षेत्रातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक आंदोलन करून  सामान्य जणांना न्याय मिळवून दिला. विद्यापीठ स्तरीय शिक्षणात सिनेट सदस्यांची भूमिका ही फार महत्त्वाची व निर्णायक असते.  शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे ते मानवाला सर्वांगसुंदर घडविण्याचे कार्य करते. सेक्युलर परिवर्तन पॅनलने शिक्षण क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण निवडणुकीत आपले उमेदवार देताना उच्चशिक्षित, जाणकार, अनुभवी, शिक्षणाविषयी आस्था असणाऱ्या, जनसामान्यांसाठी  स्वतःला वाहून घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना या निवडणुकीत उभे केले आहे . 

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत होणाऱ्या या सिनेट निवडणुकीत माननीय आमदार कपिल पाटील, राजेंद्र झाडे ,(राज्य उपाध्यक्ष) श्री अशोक बेलसरे व वरिष्ठांच्या आदेशान्वये सामान्यांना शैक्षणिक हक्क प्राप्त करून देण्यासाठी शिक्षक भरती संघटना ही सेक्युलर परिवर्तन पॅनलला आपला पाठिंबा जाहीर करत आहे.  सेक्युलर परिवर्तन पॅनल चा झेंडा हा गोंडवाना विद्यापीठात फडकवणार आहे. आदिवासी , दलित, सर्वसामान्य, गरीब , होतकरू विद्यार्थ्यांना त्यांचे हक्काचे दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही आमचा पाठिंबा सेक्युलर परिवर्तन पॅनलला देत आहोत.  आमचा विश्वास आहे की सेक्युलर परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार या निवडणुकीत घवघवीत यश संपादन करतील.पत्रकार परिषदेला शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे, विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर, विभागीय कार्यवाह सपन नेहरोत्रा, प्रा. किशोर वरभे, सुरेश डांगे, भास्कर बावनकर, प्रा. डॉ.ज्ञानेश हटवार, अनिल वासेकर, पुरुषोत्तम टोंगे, किशोर दहेकर, सेक्युलर परिवर्तन पॅनलचे व डॉक्टर आंबेडकर टीचर्स असोसिएशन चे डॉक्टर सुधाकर पेटकर सर, डॉक्टर प्रमोद शंभरकर सर व परिवर्तन पॅनल करून उभे असलेले उमेदवार,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.