क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा. पुणे अंतर्गत .. तालुका क्रीडा संकुल,विसापूर येथे विविध स्पर्धेचे आयोजन ..!
बल्लारपूर (का.प्र.) - तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय तथा तालुका क्रीडा संकुल समिती,विसापूर, बल्लारपूरच्या वतीने २९ ऑगस्ट राष्ट्रीय खेल दिवस स्व.मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त तालुका क्रीडा संकुल,विसापूर येथे विविध स्पर्धेचे आयोजन संदर्भात तालुक्यातील शाळेतील मुख्याध्यापक,क्रीडा शिक्षक,विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली.त्यात मैदानी स्पर्धा शालेय मुले/मुली वयोगट १२ वर्ष आतील ८०,४०० मिटर दौड,१६ वर्ष आतील मुले/मुली २००,१००० मिटर दौड व गोळा फेक,व 16 वर्ष वरील खुलागट करिता २००,१६०० मिटर दौड.१६ वर्ष वरील 5 किलो मिटर दौड,गोळा फेक,तसेच स्विमिंग स्पर्धा १० वर्ष आतील मुले/मुली,17 वर्ष आतील मुले/मुली,खुला वयोगट पुरुष/महिला,तसेच महिला खुला वयोगट कबड्डी सामने,हॉकी प्रदर्शन सामना घेण्याचे ठरविलेले आहे.तरी राष्ट्रीय खेल दिवस हा तालुक्यातील सर्वच युवान पासून तर जेस्ट खेडाळू पर्यंतचे वेक्ती मैदानी स्पर्धेत सहभागी घेण्या करिता आव्हान करण्यात आले आहे.सदर बैठक तहसीलदार तथा क्रीडा संकुल समिती कार्याध्यक्ष डॉ. कांचन जगताप, सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी मुश्ताक शेख,गटशिक्षण अधिकारी श्री लामगे,तालुका क्रीडा अधिकारी तथा तालुका क्रीडा समिती सचिव श्री राजू वढते,आमंत्रित सदस्य तालुका क्रीडा संकुल समिती तथा तालुका क्रीडा संयोजक श्री किशोर मोहूर्ले, आमंत्रित सदस्य श्री नरेंद्रसिंग दारी,आमंत्रित सदस्य श्री प्रशांत दंतूलवार, हॉकी असो. चंद्रपूरचे पदाधिकारी श्री समीर पठाण,मैदानी चे श्री रोशन भुजाडे यादी उपस्थित होते.सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी दिनांक २५/८/०२२ पर्यंत तालुका क्रीडा संकुल,विसापूर, बल्लारपूर येथे आपल्या नावाची यादी जमा करावी.इतर माहिती करिता श्री किशोर मोहूर्ले,(आमंत्रित सदस्य तालुका क्रीडा संकुल समिती तथा तालुका क्रीडा संयोजक) किंवा श्री शिवराज भरडकर यांच्याशी संपर्क साधावा.