स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भद्रावती येथे सायकल रॅली संपन्न..!

भद्रावती (ता.प्र.) - संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना या वर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. "हर घर झेंडा " हा कार्यक्रम तसेच विविध कार्यालयात दिनांक 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रध्वजासंबंधी अभिमान बाळगावा व हर घर तिरंगा या अभियानात प्रत्येक नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या घरावर प्रत्येकाने राष्ट्रध्वज लावावा यासाठी जाणीव जागृती व्हावी म्हणून तहसील कार्यालय भद्रावती, पंचायत समिती भद्रावती, नगरपरिषद भद्रावती, समस्त शाळा महाविद्यालयाच्या वतीने आज दिनांक १३/८/२००५ ला सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले .स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सायकल रॅलीसाठी भद्रावती येथील तहसील कार्यालयात समस्त शाळातील विद्यार्थी ,शिक्षक, कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी ,तहसील कार्यालय व पंचायत समितीचे कर्मचारी आपल्या सायकलवर राष्ट्रध्वज लावून एकत्र आले.यावेळी तहसील कार्यालय भद्रावती येथे माननीय तहसीलदार श्री. सोनवणे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. ‌त्यानंतर समस्त विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीसाठी दोन दोन च्या रांगेत लाईनअप केले.या सायकल रॅलीला माननीय तहसीलदार सोनवणे साहेब भद्रावतीचे प्रथम नागरिक श्री अनिल भाऊ धानोरकर यांनी हीरवी झेंडी दाखवून रॅली ला सुरुवात केली . ही सायकल रॅली तहसील कार्यालय भद्रावती इथून निघून भद्रावती येथील बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वार मार्गे नगरपरिषद भद्रावती येथे मुख्य मार्गे पोहचली . 

नगरपरिषद भद्रावती येथे नगराध्यक्ष श्री अनिल भाऊ धानोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सायकल रॅली हुतात्मा स्मारक येथे पोहोचली. हुतात्मा स्मारक येथे सुद्धा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.त्यानंतर मुख्य मार्गे सायकल रॅली गणेश मंदिर परिसरात पोचली व इथे या सायकलचा समारोप करण्यात आला.यावेळी भद्रावती शहरातील विविध नागरिक या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते . विशेष म्हणजे नगराध्यक्ष श्री अनिल धानोरकर, उपाध्यक्ष संतोष भाऊ आमणे, भद्रावती नगरपरिषदेचे चे माजी उपाध्यक्ष प्रफुलभाऊ चटकी, रविभाऊ देऊरकर आदी मान्यवरांनी स्वतः सायकल चालवत रॅलीत सहभागी झाले . तसेच समस्त शाळेतील विद्यार्थी या रॅली सायकलने सहभागी झाले होते. गणेश मंदिर परिसरात या सायकल रॅली चा समारोप करण्यात आला. प्रत्येकांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज लावावा व नगरपरिषदेअंतर्गत विविध स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन भद्रावती चे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले . सायकल रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना नाश्ता व पाण्याची व्यवस्था नगरपरिषदेकडून करण्यात आली. यावेळी पोलीस प्रशासन,अॅबुलंन्स पाण्याची व्यवस्था करण्यात आली. भद्रावती चे तहसीलदार श्री सोनवणे साहेब, प.स.भद्रावती चे बी इ ओ श्री धनपाल फटिंग साहेब, ठाणेदार श्री भारती साहेब ,नगराध्यक्ष श्री अनिलभाऊ धानोरकर, उपाध्यक्ष श्री संतोष भाऊ आमने, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर , प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे डॉ. ज्ञानेश हटवार, डॉ राकेश तिवारी, तालुका क्रीडा अधिकारी तसेच भद्रावतीतील सर्व शाळांतील शिक्षक प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. ही रॅली यशस्वी होण्यासाठी पोलिस प्रशासन, तहसीलदार, नगरपरिषद प्रशासन ,बीईओ व सर्व शाळांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".