स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम..!

यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम..!

भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अत्यंत प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . आज दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोज शनिवारला याच कार्यक्रमांतर्गत प्रशासनाच्या सूचनेनुसार ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला संस्थेचे सेवा जेष्ठ विश्वस्त श्री दिलीप शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत आहे. याचाच भाग म्हणून यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक विद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे . आज झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून दिलीप शिंदे संस्था सदस्य , प्राचार्य  डॉ. जयंत वानखेडे , मुख्याध्यापक श्री प्रवीण शिंदे ,  मुख्याध्यापक  धीरज ताजणे, माननीय अतुल  गुंडावर सर प्रामुख्याने उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक विद्यालय चिंचोर्डी,भद्रावती येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यात निबंध स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा , अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेले आहेत . पूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना,  मागील दोन दिवसापासून यशवंतराव शिंदे प्राथमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना "शहिदांच्या वीरमरणांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे ते असेच अबाधित राहण्यासाठी आपणही आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे " असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेतील समस्त शिक्षक वृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".