भद्रावती (ता.प्र.) - राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार गणपती सणापूर्वी करण्याची मागणी शिक्षक भारतीने केली आहे. राज्यामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. घरोघरी गणपतीची आरास केली जाते. श्री गणेशाचे आगमन ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे.गणेश उत्सव आनंदाने साजरा करता यावा यासाठी समस्त शिक्षक, कर्मचाऱ्यांना या महिन्यात पगार लवकर द्यावे.राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार दिनांक २५ ऑगस्ट पूर्वी होणे आवश्यक आहे. गणेश उत्सवापूर्वी पगार होण्यासाठी आगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन देयके जमा करून शासनाने पुरेसा निधी वितरित करणे आवश्यक आहे. राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार गणपती सणापूर्वी होण्याबाबत संबंधितांना उचित आदेश देण्यात यावेत , अशी मागणी महाराष्ट्र शासनाचे वित्त विभागाचे प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव तसेच शिक्षण संचालक,पुणे यांना निवेदन शिक्षक भारती संघटने तर्फे देण्यात आले. शिक्षक कर्मचारी यांचे वेतन गणेश उत्सवा पूर्वी करण्यात यावे अशी मागणी शिक्षक भारतीचे नागपूर विभागीय सरचिटणीस तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे, माध्यमिक अध्यक्ष भास्कर बावनकर, उच्च माध्यमिक अध्यक्ष डॉ.ज्ञानेश हटवार, पुरुषोत्तम टोंगे, राकेश पाताडे, राबिन करमरकर, महेश भगत,बजरंग जेनेकर, रावण शेरकुरे, निर्मला सोनवने, रोहिनी मंगरुळकर, रंजना तडस, जब्बार शेख आदींनी केली आहे.
राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार गणपती सणापूर्वी करा - शिक्षक भारतीची मागणी
byChandikaexpress
-
0
