निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन..!
भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना तर्फे भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असण्याच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सव अंतर्गत वक्तृत्व व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके प्रमुख पाहुणे डॉ एम एन खादरी प्रा सचिन श्रीराम प्रा प्रा कुलदीप भोंगळे व आयोजक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ गजेंद्र बेदरे उपस्थित होते.या प्रसंगी महाविद्यालयाच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धा व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा यामध्ये सहभाग घेतला याप्रसंगी प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु पल्लवी गोवरदिपे तर आभार प्रदर्शन प्रा सचिन श्रीरामे यांनी केले या कार्यक्रमांमध्ये सुरज जीवतोडे, विभा तातेड, ऐश्वर्या तिवारी, दिपाली बोईनवार, ऋत्विक सोनारखन, प्रांजली रायपुरे व संकेत जमदाडे यांनी सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
